शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

'शेतीला 'सकस' करणाऱ्याचा गौरव'; अण्णासाहेब जगताप यांना शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 15:14 IST

Farmer Award माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील प्रगतशील व प्रयोगशिल शेतकऱ्याचा 2019 चा वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरव

ठळक मुद्दे अण्णासाहेब हे सेंद्रिय शेतीचा मागील १० वर्षांपासून प्रसार आणि प्रचार करत आहेत. त्यांचे यु ट्यूब वर 'दिशा सेंद्रिय शेती' असे चॅनलसुद्धा आहे. यावरून ते सेंदीय शेतीच्या प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवतात.

माजलगाव : तालुक्यातील सावरगाव येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी अण्णासाहेब अर्जुनराव जगताप यांना 2019 चा महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने बुधवारी घोषणा केली. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून विविध प्रयोग करून जमिनीला 'सकस' करण्याच्या त्यांच्या कामगिरीचा हा शासनाने केलेला गौरव ठरला आहे. मागील दहा वर्षांपासून अण्णासाहेब जगताप सेंद्रिय शेतीचा एकनिष्ठेने प्रसार आणि प्रचार करत आहेत. 

राज्यात कृषी, कृषी संलग्न क्षेत्र आणि फलोत्पादन या क्षेत्रांमध्ये  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2018- 19 या वर्षांकरिता कृषी पुरस्कारांची घोषणा कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने 31 मार्च रोजी केली आहे. यात माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी अण्णासाहेब अर्जुनराव जगताप यांना 2019 चा महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. अण्णासाहेब हे सेंद्रिय शेतीचा मागील १० वर्षांपासून प्रसार आणि प्रचार करत आहेत. त्यांचे यु ट्यूब वर 'दिशा सेंद्रिय शेती' असे चॅनलसुद्धा आहे. यावरून ते सेंदीय शेतीच्या प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवतात. या पुरस्कारामुळे अण्णासाहेब जगताप यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

न डगमगता प्रयोग करत राहिलो सेंद्रिय भाज्यांचा माणसांच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतात. तसेच परिणाम सेंद्रिय शेती केल्याने जमिनीवर होतात. विषमुक्त पिके जोमाने येतात आणि साहजिकच त्यांची पौष्टिकता वाढते. सुरुवातीला सेंद्रिय शेती करताना अनेक अडचणी आल्या. परंतु, न डगमगता मी माझ्या प्रयोगांवर ठाम राहिलो. गावातील इतर शेतकरी सुरुवातीला हिणवायचे आता मदतीला तत्पर असतात. सध्या माझ्याकडे भाज्या, गाजर, धान्य यांची विविध प्रकारची गावरान ६० बियाणे आहेत. या बियाणांना गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक येथून मोठी मागणी आहे. हा व्यवसाय नाही मात्र सेंद्रिय शेतीचा प्रसार व्हावा हाच उद्धेश आहे.  पुढच्या पिढीवर नापिकी जमिनीचे मोठे संकट येणाऱ्या काळात उद्भवणार आहे. त्यावर मात करायची आहे.- अण्णासाहेब जगताप, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडagricultureशेती