केज रोटरी क्लबच्या वतीने तीन ऑक्सिजन मशीन भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:58+5:302021-07-04T04:22:58+5:30

केज : येथील रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने केज उपजिल्हा रुग्णालयाला बालकांसाठी दोन व प्रौढांसाठी एक अत्याधुनिक ऑक्सिजन कॉन्संट्रेटर ...

A gift of three oxygen machines on behalf of the Cage Rotary Club | केज रोटरी क्लबच्या वतीने तीन ऑक्सिजन मशीन भेट

केज रोटरी क्लबच्या वतीने तीन ऑक्सिजन मशीन भेट

केज : येथील रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने केज उपजिल्हा रुग्णालयाला बालकांसाठी दोन व प्रौढांसाठी एक अत्याधुनिक ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन ३० जून रोजी छोटेखानी कार्यक्रमात भेट देण्यात आल्या.

कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाला अत्याधुनिक मशीन व उपकरणाची गरज आहे. ही गरज ओळखून दिवालीबेन ट्रस्ट (बारडोली), पुणे रोटरी क्लबचे प्रांतपाल हरीश मोटवाणी यांच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने तीन मशीन भेट दिल्या.

या मशीन उपजिल्हा रुग्णालयाला खूप उपयोगी आहेत. यातील छोट्या दोन मशीन भविष्यात बालकांना तर मोठी मशीन प्रौढांना उपयोगी पडणार असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी सांगितले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले, धनराज पुरी, शोभा जाधव, बापूराव शिंगण, अरुण अंजान, प्रांतसचिव सुनील जोशी व केज रोटरीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

030721\136-img-20210703-wa0003.jpg

केज उपजिल्हा रुग्णालयाला केज रोटरी क्लबच्या वतीने तीन ऑक्सिजन मशीन भेट देताना रोटरी क्लब ऑफ केजचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले, सचिव धनराज पुरी, प्रोजेक्ट चेअरमन शोभा जाधव, विद्यमान अध्यक्ष बापूराव शिंगण, सचिव अरुण अंजान, प्रांतसचिव सुनील जोशी यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय राऊत यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वर्ग.

Web Title: A gift of three oxygen machines on behalf of the Cage Rotary Club