आधी अश्लील व्हिडीओ बघितला अन् त्यानंतर...; मुलीचा हौदात सापडला मृतदेह, घटनेने बीड हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 19:24 IST2026-03-28T19:23:19+5:302026-03-28T19:24:31+5:30

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात एक भयंकर घटना समोर आली. एका चिमुरडीवर आत्याभावानेच अत्याचार केला. 

First watched a pornographic video and then...; Girl's body found in a well, incident shakes Beed | आधी अश्लील व्हिडीओ बघितला अन् त्यानंतर...; मुलीचा हौदात सापडला मृतदेह, घटनेने बीड हादरले

आधी अश्लील व्हिडीओ बघितला अन् त्यानंतर...; मुलीचा हौदात सापडला मृतदेह, घटनेने बीड हादरले

अंबाजोगाई (जि. बीड) अश्लील व्हिडीओ पाहून अवघ्या अडीच वर्षाच्या बालिकेवर १५ वर्षांच्या नातेवाईक मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे हा घृणास्पद प्रकार उघड झाला.

डोंगर पिंपळा येथील या चिमुरडीचा १७ मार्च रोजी घरासमोरील पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला. सुरुवातीला हा केवळ अपघात वाटल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करताना अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरविली.

याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१) आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

असा लागला छडा

पीडितेच्या आत्याचा मुलगा (वय १५ वर्षे ५ महिने) हा बहिणीच्या मृत्यूनंतर तीन दिवस जेवण करत नव्हता आणि सतत रडत होता.

त्यातून संशय बळावला आणि पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मोबाइलवर अश्लील चित्रफीत पाहून त्याने चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुरडीला दुचाकीवर नेले आणि घरात कोणी नसताना अत्याचार केल्याचे मान्य केले. 

Web Title : बीड में सनसनी: अश्लील वीडियो देखने के बाद नाबालिग से बलात्कार, हत्या; टंकी में मिला शव

Web Summary : बीड में एक चौंकाने वाली घटना सामने आई है जिसमें 15 वर्षीय लड़के ने अश्लील वीडियो देखने के बाद ढाई साल की बच्ची के साथ यौन उत्पीड़न किया और उसकी हत्या कर दी। पोस्टमार्टम के दौरान अपराध का पता चला। आरोपी, एक रिश्तेदार, ने अपने व्यवहार से संदेह होने के बाद कबूल किया।

Web Title : Beed Shaken: Minor Raped, Murdered After Watching Porn; Body Found in Tank

Web Summary : A shocking incident in Beed reveals a 15-year-old sexually assaulted and murdered a two-and-a-half-year-old girl after watching obscene videos. The crime was discovered during the post-mortem. The accused, a relative, confessed after suspicion arose from his behavior.