महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST2021-07-25T04:27:50+5:302021-07-25T04:27:50+5:30

बसव ब्रिगेडची मागणी अंबाजोगाई : राज्यातील लिंगायत समाजातील तरुण, सुशिक्षित बेरोजगारांना आणि नवउद्योजकांना स्वयंउद्योगासाठी आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी शासनाने राज्यात ...

Establish Mahatma Basaveshwar Economic Development Corporation | महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा

महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा

बसव ब्रिगेडची मागणी

अंबाजोगाई : राज्यातील लिंगायत समाजातील तरुण, सुशिक्षित बेरोजगारांना आणि नवउद्योजकांना स्वयंउद्योगासाठी आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी शासनाने राज्यात महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.

राज्यात लिंगायत समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा समाज देशाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. संख्येच्या प्रमाणात समाजातील अनेक तरुण सध्या बेरोजगार आहेत. बेरोजगार तरुणांना आतापर्यंत शासनाकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. आता स्वयंरोजगारासाठी शासनाच्या आर्थिक मदतीची गरज आहे. त्या पूर्ततेसाठी राज्यात महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे गरजेचे आहे. तसेच लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा म्हणून समाजबांधवांनी मोर्चेही काढले. मात्र, ती मागणी अद्याप मंजूर झाली नाही. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे. समाजातील अनेक तरुण सध्या बेरोजगार आहेत. बेरोजगार तरुणांना आतापर्यंत शासनाकडून आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. आता स्वयंरोजगारासाठी शासनाच्या आर्थिक मदतीची गरज आहे. त्या पूर्ततेसाठी राज्यात महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे गरजेचे आहे, अशी मागणी विनोद पोखरकर यांनी केली आहे.

Web Title: Establish Mahatma Basaveshwar Economic Development Corporation