शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

वांगीकरांच्या एकजुटीमुळे कोरोनाचा पाश होतोय सैल - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST

संताेष स्वामी दिंद्रुड : कोरोनाच्या महाभयंकर दुसऱ्या लाटेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात या संसर्गाने हाहाकार माजवला होता. माजलगाव तालुक्यातील ...

संताेष स्वामी

दिंद्रुड : कोरोनाच्या महाभयंकर दुसऱ्या लाटेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात या संसर्गाने हाहाकार माजवला होता. माजलगाव तालुक्यातील वांगी या छोट्याशा गावात तब्बल दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून आले होते. कोरोना संसर्गाने सात जणांचा मृत्यू झाला. अशा गंभीर परिस्थितीला सामोरे जात यातून सहीसलामत बाहेर येण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यांची भूमिका मोलाची ठरली. मागील आठ दिवसात एकही रुग्ण या गावात आढळला नसल्याने कोरोनाचा पाश सैल होताना दिसत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वांगी ग्रामस्थ अडकले होते. घराघरात संसर्गबाधित रुग्ण आढळून येत होते. कोरोनाने केवळ एका महिन्यात ७ जणांचा बळी घेतला. येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. सत्यप्रेम खाडे यांनी घराघरात लक्षणे दिसणाऱ्यांच्या चाचण्या केल्या. कोरोनाबाधितांना माजलगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. घराघरात कोरोनासदृश आजार असणाऱ्यांना पुढे येत चाचणी करण्याचे आवाहन केले. येथील सरपंच संध्या दीपक जाधव, ग्रामसेवक दत्तात्रेय मानकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी यांनी मोलाची भूमिका निभावत कोरोनाच्या संकटावर मात केली. गेल्या आठ दिवसांत एकही रुग्ण या गावात सापडलेला नाही. ग्रामस्थांनी या संकटात प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन केल्यामुळे गाव आज कोरोनामुक्त झाले आहे.

वांगी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या आवाहनाला साथ देत नियमांचे पालन केले. स्वच्छता, मास्क व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब केला. गाव अध्यात्मिक असल्याने एकमेकांशी संवाद साधत कोरोनाला हद्दपार केले.

- संध्या दीपक जाधव, सरपंच.

संसर्ग कमी झाल्यामुळे वांगी ग्रामस्थांनी निष्काळजीपणा न दाखवता, त्रिसूत्रीचे पालन करावे. साथीच्या आजारांवर तत्काळ उपचार करून घ्यावेत. कुठलाही संसर्गजन्य लक्षणे आढळल्यास न लपवता चाचणी करून घेणे गरजेचे आहे. गावाच्या सुरक्षेसाठी सर्व ग्रामस्थांनी पुढे येत दाखवलेला एकोपा कौतुकास्पद आहे. - डाॅ. सत्यप्रेम खाडे,

समुदाय आरोग्य अधिकारी, प्रा. उपकेंद्र, वांगी