शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

चालकाला मारहाण करून बिस्कीटचा कंटेनर पळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

बीड : आंध्र प्रदेशहून गुजरातकडे बिस्कीट घेऊन जाणाऱ्या कंटेनरला चोरट्यांनी टेम्पो आडवा लावत दोन चालकांना मारहाण करून बिस्कीटचा कंटेनर ...

बीड : आंध्र प्रदेशहून गुजरातकडे बिस्कीट घेऊन जाणाऱ्या कंटेनरला चोरट्यांनी टेम्पो आडवा लावत दोन चालकांना मारहाण करून बिस्कीटचा कंटेनर पळवून नेला. ही घटना शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान चौसाळा बायपासवर घडली. चालकांनी घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांत अलर्ट दिला. त्यानंतर लातूर येथील पोलिसांनी कंटेनरसह तीन चोरट्यांना अटक केली आहे. या कंटेनरमध्ये २५ ते ३० लाख रुपयांची बिस्कीटे असल्याचा अंदाज आहे.

अस्लम खान अली व शहेबाज खान (रा.मेवात, राज्य हरियाणा) हे आपल्या कंटेनर ( एमएच ४० डीजे ४५९६)मध्ये आंध्र प्रदेशातून गुजरातकडे एका नामांकित बिस्कीट कंपनीचा माल घेऊन जात होते. रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान बीड तालुक्यातील चौसाळा बायपासवर काही चोरट्यांनी या कंटेनरला टेम्पो आडवा लावला. त्यामुळे चालकाने कंटेनर थांबवले. यावेळी त्याला मारहाण करण्यात आली. तो गंभीर जखमी झाल्यानंतर कंटेनर पळवून नेला. घटनेची माहिती चालकाने नेकनूर पोलिसांना व चौसाळा चौकीला दिल्यानंतर नेकनूर ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, दीपक खांडेकर, अमोल नवले, सुशांत सोनवणे, जायभाये, डोंगरे, पारधी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, कोणत्या दिशेने हा कंटेनर चोरटे घेऊन जातील याचा अंदाज आल्याने त्या ठिकाणच्या सर्व पोलीस ठाण्यास अलर्ट केले. दरम्यान, हा कंटेनर लातूर तालुक्यातील जातेगावला असल्याचे तेथील पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी हा कंटेनर जप्त करून तीन चोरट्यांना ताब्यात घेतले. कंटेनरमध्ये बिस्कीटचे १४०० बॉक्स होते, ज्याची किंमत २५ ते ३० लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर नेकनूर पोलीस लातूर येथे रवाना झाले आहेत. दरम्यान, या चोरट्यांनी चालकांना मारहाण केल्यानंतर त्यांच्याकडून नगदी २० हजार आणि दोन मोबाइलही चोरून नेले होते. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

...

टोळी हाती लागण्याची शक्यता

बिस्कीटचा कंटेनर चोरून नेत असताना बारा ते पंधरा चोरटे असल्याचे जखमी चालकाने पोलिसांना सांगितले आहे. लातूर पोलिसांनी तीन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अन्य साथीदारांची माहिती विचारली जात आहे. त्यांना देखील ताब्यात घेतले जाणार आहे. दरम्यान, पकडलेल्यांपैकी दोन चोरटे हे बार्शी तालुक्यातील पारा येथील तर एक चोरटा केज तालुक्यातील नांदुरघाट येथील आहे. त्यामुळे मोठी वाटमारी करणारी टोळी ताब्यात येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.