लक्षणे लपवू नका, चाचणी करून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST2021-07-25T04:27:53+5:302021-07-25T04:27:53+5:30

अंबेजोगाई तालुक्यात गेल्या दीड महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात खालावली होती. मात्र, या आठवड्यात पुन्हा रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. ...

Don't hide the symptoms, get tested | लक्षणे लपवू नका, चाचणी करून घ्या

लक्षणे लपवू नका, चाचणी करून घ्या

अंबेजोगाई तालुक्यात गेल्या दीड महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात खालावली होती. मात्र, या आठवड्यात पुन्हा रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. ही वाढती रुग्णसंख्या तालुक्यासाठी धोकादायक ठरणारी आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, असे समजत दुसरीकडे नागरिकांनी बेसावध न राहता, यापुढेही आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात अँटिजन कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. कोरोना संसर्गाचे निदान व उपचार लवकर झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते. सर्दी, ताप, खोकला यांसारखी कोरोनाविषयक लक्षणे आढळून येताच, नागरिकांनी कोरोना चाचणी अंबेजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात करून घ्यावी. कोणताही आजार लपवू नये, असे आवाहनही डॉ.लोमटे यांनी केले.

लसीकरण ही महत्त्वाचे

अंबेजोगाई तालुक्यात अंबेजोगाई शहरात स्वाराती रुग्णालय व खोलेश्वर विद्यालय या दोन ठिकाणी तर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण सुरू आहे. पहिला व दुसरा डोस देणे सुरू आहे. नागरिकांनी दक्षता बाळगून लसीकरणास प्राधान्य द्यावे, असे आवाहनही डॉ.लोमटे यांनी केले आहे.

Web Title: Don't hide the symptoms, get tested