शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

पेठेत पथदिवे सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

बीड : शहरातील पेठ बीड भागातील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अंधाराचा फायदा घेत ...

बीड : शहरातील पेठ बीड भागातील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अंधाराचा फायदा घेत भुरटे चोरही सक्रिय झाले आहेत. या भागात मोजक्या ठिकाणी पथदिवे सुरू आहेत. मात्र तेल गल्ली, महावीर चौक, बुरूड गल्ली, साळ गल्ली तसेच विठ्ठल मंदिरालगतचे पथदिवे बंद असून, ते सुरू करण्याची मागणी होत आहे.

कापूस, तूर लागवडीची लगबग

शिरूर कासार : सध्या तालुक्यात पाऊस झाल्याने कापूस, तूर लागवडीची लगबग सुरू आहे. रेघा टाकून बी टोकन पद्धतीने शेतकरी लागवड करीत आहेत. बाजरी, मुगाची पेरणीही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. एकंदरीत शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त दिसत आहेत.

राडी-मुडेगाव रस्त्यावर खड्डे

अंबाजोगाई : आठ महिन्यांपूर्वीच राडी ते मुडेगाव या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण केले होते. शासनाने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, काम करणाऱ्या कंत्राटदाराने या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता कंत्राटदारांच्या माध्यमातून पुन्हा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी

बीड : नगर परिषदेकडून शहराला अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहराच्या काही भागात तीन दिवसांआड, तर काही भागांत बारा ते पंधरा दिवसांआड आणि तेही तीन ते चार तास याप्रमाणे पाणीपुरवठा होतो. शहरात होणारा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.