शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

देवळा येथील रंगीत टरबुजाला विदेशात मागणी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : देवळा (ता. अंबाजोगाई) येथे वरून हिरवे तर आतून पिवळे असणाऱ्या ‘आरोही’ या रंगीत टरबुजाचे उत्पादन ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : देवळा (ता. अंबाजोगाई) येथे वरून हिरवे तर आतून पिवळे असणाऱ्या ‘आरोही’ या रंगीत टरबुजाचे उत्पादन घेण्यात आले आहे. या रंगीत टरबुजाला परदेशातून मागणी होत आहे. ही किमया युवा शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी साधली असून, या प्रयोगातून त्यांनी दोन महिन्यात केवळ ३० गुंठे जमिनीत दीड लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. जे विकेल ते पिकेल, या धर्तीवर शेतीत नवीन उत्पादन घेतले तर निश्चितच त्याचा फायदा होतो. देवळा येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र भानुदासराव देवरवाडे यांनी नोन यू सिड्स ‘आरोही आणि विशाला’ अशा दोन प्रजातीच्या रंगीत टरबुजांचे उत्पादन घेतले. हे टरबूज वरून हिरवे आणि आतून पिवळे तर वरून पिवळे आणि आतून लाल अशा रंगाचे आहे. देवरवाडे यांनी ३० गुंठे जमिनीत ५ हजार रोपांची लागवड २४ नोव्हेंबर रोजी केली. पहिली तोड २३ जानेवारीला झाली. अवघ्या दोन महिन्यात साधारण ४ किलो ते ५ किलो वजनाचे फळ झाले आहे. ही लागवड हिवाळ्यातील असून, बदलत्या हवामानाचा कसलाही फरक या पिकावर पडला नाही. महाराष्ट्रातही उत्तम रंगीत टरबूज येऊ शकते, हे या प्रयोगातून शेतकरी देवरवाडे यांनी योग्य नियोजनातून सिद्ध केले आहे. अशा प्रयोगांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत मागणी असणाऱ्या नवनवीन वाणांद्वारे उत्तम नफा मिळवून देणारे पीक घेणे शक्य आहे. रिलायन्स मॉल, मुंबई यांनी जागेवर येऊन या टरबुजाची खरेदी केली आहे. हे टरबूज तैवान देशात लोकप्रिय असून, याला मोठ्या शहरांतही मागणी आहे. देवरवाडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्यास निश्चित यश व मोबदला मिळतो, याचे उदाहरण नव्या पिढीसमोर ठेवले आहे.