शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; तातडीने चाचणी करून घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या अद्यापही आटोक्यात आलेली नाही. त्यातच कोरोना आणि डेंग्यूची लक्षणे सारखीच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या अद्यापही आटोक्यात आलेली नाही. त्यातच कोरोना आणि डेंग्यूची लक्षणे सारखीच असल्याने कोणती तपासणी करावी, असा प्रश्न निर्माण होत आहे; परंतु थोडाही त्रास झाला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने आरोग्य तपासणी करून तत्काळ निदान करावे व उपचार करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सर्दी, खोकला व ताप

अंग लाल होणे, लघवी व नाकातून रक्त येणे, थंडी वाजणे, एक दिवसाआड ताप येणे, उच्च ताप येणे, उलटी, मळमळ, लाल डोळे होणे, हाताचे तळवे लाल दिसणे, ही डेंग्यूची लक्षणे आहेत.

ताप, श्वास घेण्यास त्रास, सर्दी, खोकला, दम लागणे, सहा मिनिटे वॉक केल्यानंतर धाप लागणे, ही कोरोनाची लक्षणे.

डासांपासून सावध राहा

आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, डासांची उत्पत्ती रोखणे, घराभोवती व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देता वाहते ठेवणे, छतावरही पाणी साचू देऊ नये, नारळ करवंट्या, प्लास्टिकचे कंटेनर नष्ट करणे आदी काळजी घेणे गरजेचे आहे. थोडाही त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे तांत्रिक विभाग प्रमुख माजीज शेख यांनी सांगितले.

काळजी अन् सल्ला घ्या

कोरोना आणि डेंग्यूची काही लक्षणे सारखीच असली तरी चाचणी वेगळी आहे. मागील तीन वर्षांत डेंग्यूचा एकही बळी गेलेला नाही. आतापर्यंत केवळ दोनच रुग्ण आढळले आहेत. यावर उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीही काळजी अन् सल्ला घ्यावा.

- डॉ. मिर्झा बेग, हिवताप अधिकारी

चाचणी कुठली?

कोरोनासाठी- अँटिजन, आरटीपीसीआर

डेंग्यूसाठी - एलायझा चाचणी

डेंग्यूचे रुग्ण

१८८

३९