भाजी मंडईतील कोंडी हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:01 IST2021-02-06T05:01:34+5:302021-02-06T05:01:34+5:30

बसस्थानकाचे काम गतीने करावे बीड : बीड बसस्थानक, आगाराचे बांधकाम सध्या केले जात आहे. परंतु लॉकडाऊनमुळे हे काम बंद ...

The conundrum in the vegetable market was not removed | भाजी मंडईतील कोंडी हटेना

भाजी मंडईतील कोंडी हटेना

बसस्थानकाचे काम गतीने करावे

बीड : बीड बसस्थानक, आगाराचे बांधकाम सध्या केले जात आहे. परंतु लॉकडाऊनमुळे हे काम बंद पडले होते. आता बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. सध्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष आहे.

कोंडवाडा दुरुस्तीकडे दुर्लक्ष

बीड : मोकाट गुरांना कोंडण्यासाठी पालिकेच्या मालकीचा कोंडवाडा आहे; परंतु त्याची अवस्था खराब झालेली आहे. मागील अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. कोंडवाडा दुरुस्त करून गुरांना त्यात कोंंडावे, अशी मागणी आहे.

नेकनूर-पोथरा रस्त्याची दुरवस्था

बीड : तालुक्यातील नेकनूर ते पोथरा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नेकनूर हे आठवडी बाजाराचे गाव असल्यामुळे रहदारी जास्त असते. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

Web Title: The conundrum in the vegetable market was not removed