साडेतीन महिन्यांनंतर माजलगावकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:54+5:302021-07-07T04:41:54+5:30

सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या शुन्यावर माजलगाव : तालुक्यात साडेतीन महिन्यांपासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या कमी - जास्त होत असताना प्रथमच ...

Consolation to Majalgaonkar after three and a half months | साडेतीन महिन्यांनंतर माजलगावकरांना दिलासा

साडेतीन महिन्यांनंतर माजलगावकरांना दिलासा

सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या शुन्यावर

माजलगाव : तालुक्यात साडेतीन महिन्यांपासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या कमी - जास्त होत असताना प्रथमच सोमवारी ही संख्या शुन्यावर आली. यामुळे माजलगावकरांना दिलासा मिळाला असला तरी गाफील राहून चालणार नाही.

माजलगाव तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात सर्वात शेवटी कोरोना रुग्ण निघण्यास सुरुवात झाली होती. निघणारी ही संख्यादेखील इतर तालुक्याच्या मानाने आटोक्यातच होती. त्यानंतर दुसऱ्या लाटेतदेखील मागील तीन महिन्यात केवळ एक किंवा दोन वेळा शंभरपेक्षा जास्त कोरोना निघाले होते. त्यानंतर तालुक्यात ही संख्या आटोक्यातच होती.

पहिल्या लाटेत माजलगाव शहरात रुग्ण निघत असत तर दुसऱ्याला टेस्ट शहरात रुग्ण हे केवळ बोटावर मोजण्याएवढेच निघत असत. याउलट ग्रामीण भागात रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात निघत होती.

वीस मार्चनंतर माजलगाव तालुक्यात दुसऱ्या लाटेत पूर्ण रुग्ण निघायला सुरुवात झाली होती. साडेतीन महिने रोज काहीतरी रुग्ण निघत होते. परंतु सोमवारी तालुक्यात एकही रुग्ण निघाला नसल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

तालुक्यात रुग्ण संख्या आटोक्यात आली असली तरी नागरिकांनी गाफील राहून चालणार नाही. त्यांनी काळजी घ्यावी. मास्क व सॅनिटायझरच्या वापरासह एकमेकांशी संपर्क टाळावा व जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.

- डॉ. मधुकर घुबडे, तालुका वैद्यकीय अधिकारी

Web Title: Consolation to Majalgaonkar after three and a half months