केज येथे महाविद्यालयीन युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:34 IST2021-02-10T04:34:34+5:302021-02-10T04:34:34+5:30

केज : केज येथे एका महाविद्यालयीन युवतीने घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी केज पोलिसात ...

College girl commits suicide by hanging at Cage | केज येथे महाविद्यालयीन युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

केज येथे महाविद्यालयीन युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

केज : केज येथे एका महाविद्यालयीन युवतीने घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

केज शहरातील धारूर रोड लगतच्या भवानी नगर येथे ९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता तेजल संपत चव्हाण (वय १९ वर्षे) हिने राहत्या घरात छताच्या पंंख्याला साडीने गळफास घेेेऊन आत्महत्त्या केली. तेेेजलचे आई-वडील हे अहमदनगर येेथे काम करीत होते. ती केेेज येेथे तिच्या आजी - आजोबांकडे राहात होती.

तेजल ही अंबाजोगाई येथील महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तिचे माजलगाव तालुक्यातील वानटाकळी येथील नात्यातील तरुणाशी लग्न ठरले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि वैभव राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली. मुलीचे आजोबा गणपत चव्हाण यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार सीआरपीसी १७४ नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक फौजदार महादेव गुजर व मंगेश भोले हे करीत आहेत. दरम्यान, तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Web Title: College girl commits suicide by hanging at Cage