शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी केज तहसीलसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क केज : चंदनसावरगाव जवळबन पावनधाम हा रस्ता मागील दहा वर्षांपासून जागोजागी खड्डे पडून खराब झाला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

केज : चंदनसावरगाव जवळबन पावनधाम हा रस्ता मागील दहा वर्षांपासून जागोजागी खड्डे पडून खराब झाला आहे. या रस्त्याच्या मागणीसाठी अनेकवेळा निवेदन देण्यासह आंदोलने करूनही रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने सोमवारी केज तहसील कार्यालयासमोर या रस्त्याच्या मागणीसाठी लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले

तालुक्यातील जवळबनकडे जाणारे तिन्ही मुख्य रस्ते प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडून खराब झाले आहेत. गावातील नागरिकांना, वाहनधारकांना, महिलांना, आबालवृद्धांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. सध्या पावसाळ्यात तर कोणत्याही रस्त्याने जाणे मुश्कील बनले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, आमदार, पालकमंत्री, खासदार, जिल्हा प्रशासन मूग गिळून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने अनेक वर्षांपासून जटिल बनलेल्या रस्त्याची कायमस्वरूपी समस्या सोडवून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत केज तहसीलसमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.

चंदनसावरगाव-जवळबन-पावनधान-बोरीसावरगाव रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला होता. मात्र, गतवर्षी कोरोना संकटात शासनाने सदर रस्ता रद्द केला. या रस्त्याला नव्याने मंजुरी द्यावी. सावळेश्वर -जवळबन डिघोळआंबा-कानडीबदन या रस्त्यांना तत्काळ स्थानिक स्वराज्य संस्थेतून मान्यता द्यावी आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. १० दिवसांच्या आत या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा अंबाजोगाई-कळंब राज्य महामार्गावर बेमुदत तीव्र स्वरूपात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, लहू गायकवाड, सुग्रीव करपे, सरपंच शिवाजी शिंपले, संदीप करपे, दिगंबर, श्रीधर भाकरे, अशोक साखरे, दत्ता साखरे, बालासाहेब करडकर, सुंदरराव साखरे, प्रवीण करपे, अविनाश करपे, पदमाकर करपे, दयानंद करपे, परसराम करपे, सुनील जोगदंड, अमोल करपे, विकास करपे, शिवाजी भाकरे, संदीप भाकरे, अंबादास करपे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या धरणे आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कैलास चाळक, शेकापचे भाई मोहन गुंड आदींनी पाठिंबा दिला. नायब तहसीलदार धस यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

050721\img_20210705_114854.jpg

रस्त्याच्या मागणीसाठी केज तहसील कार्यालया समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जवळबन येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.