शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकच्या धडकेत बीड येथील न्यायाधीशांचा मृत्यू; रेणापूर-उदगीर मार्गावर रात्री १० वाजेची घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: August 12, 2023 05:58 IST

रेणापूर (जि. लातूर) : भरधाव ट्रकने ओमनीला दिलेल्या धडकेत बीड येथील न्यायाधीश आणि त्यांचा चालक जागीच ठार झाल्याची घटना ...

रेणापूर (जि. लातूर) : भरधाव ट्रकने ओमनीला दिलेल्या धडकेत बीड येथील न्यायाधीश आणि त्यांचा चालक जागीच ठार झाल्याची घटना रेणापूर- उदगीर मार्गावरील सेवादासनगर तांडा येथे घडली. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला. तो एवढा भीषण हाेता की, यात ओमनी कारचा पार चेंदामेंदा झाला.

पाेलिसांनी सांगितले, उद्धव वसंत पाटील (रा. अजनसोंडा खु., ता. चाकूर) हे सध्याला बीड येथे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत हाेते. शुक्रवारी ते चालक बळी नंदकुमार टमके (रा. अजनसोंडा खु., ता. चाकूर) यांच्यासाेबत ओमनीने (एमएच १७ बीव्ही १२५७) गावाकडे निघाले हाेते. दरम्यान, रेणापूर- उदगीर मार्गावरील आष्टामाेडकडे जाताना सेवादासनगर तांडा येथे शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने (एमएच २४ एबी ८४०१) त्यांच्या वाहनाला जाेराची धडक दिली. यामध्ये न्यायाधीश पाटील आणि चालक टमके हे जागीच ठार झाले. हा अपघात एवढा भीषण हाेता की, ट्रक शंभर फुटावरून चुकीच्या दिशेने येत न्यायाधीशांच्या वाहनावर धडकला. घटनास्थळावरून ट्रकचालक पसार झाला. 

घटनास्थळी तांड्यावरील युवक, नागरिकांनी धाव घेतली. ओमनी वाहनाचा पार चेंदामेंदा झाल्याने त्या दाेघांनाही बाहेर काढण्यासाठी दीड तासाचा अवधी लागला. रेणापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डाॅक्टरांनी मृत घाेषित केले.

वर्षभरापूर्वीच झाली हाेती निवड...न्यायाधीश उद्धव पाटील हे गत अनेक वर्षांपासून लातूर येथे वकिली करत होते. दरम्यान, त्यांची एक वर्षापूर्वीच न्यायाधीश म्हणून निवड झाली हाेती. सध्या बीड जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. शनिवार- रविवार सुटी असल्याने ते गावाकडे रेणापूर- उदगीर मार्गावरून शुक्रवारी निघाले होते. मात्र, त्यांच्यावर काळाने घाला घातला. यातच ते आणि चालक जागीच ठार झाले.

टॅग्स :Accidentअपघात