शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

बीडची समता परिषद पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST

बीड : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी बीड जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत ...

बीड : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी बीड जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुन्हा धावली असून, अन्न आणि पाणी घेऊन समता परिषदेचे सैनिक रायगड जिल्ह्यातील महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अतिवृष्टीबाधित पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी रवाना झाले आहेत.

समता परिषदेचे मराठवाडा तथा बीड जिल्हा अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेचे बीड शहराध्यक्ष निखिल शिंदे आणि नितीन राऊत यांच्यासह समता सैनिक ५,००० चिवड्यांचे पॅकेट्स, ३०० बिसलरी पाण्याचे बॉक्स, ५,००० बिस्कीट पुडे बॉक्स यासह जीवनावश्यक वस्तू घेऊन रविवारी सायंकाळी रायगड जिल्ह्यातील महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अतिवृष्टी बाधित पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निघाले. समता परिषदेचे बीड शहराध्यक्ष निखिल शिंदे, नितीन राऊत, मनोज भानुसे, धनंजय काळे, धर्मराज दुधाळ, महेश व्यवहारे, नितीन शिंदे हेही रवाना झाले आहेत.

दोन वर्षांपूर्वीदेखील सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या आपत्तीप्रसंगी बीड जिल्हा समता परिषदेने असेच मदतकार्य राबवून तेथील पूरग्रस्त बांधवांना अन्न आणि पाण्याची व्यवस्था बीड येथून जाऊन केली होती. आज पुन्हा बीड जिल्हा समता परिषद रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आल्याने या मदत कार्याचे अभिनंदन होत आहे.

समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत, श्री संत नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक ॲड. संदीप बेदरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे, नारायण शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी सायंकाळी समता परिषदेचे हे मदत कार्य आणि समता सैनिक रायगड जिल्ह्यातील महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याकडे रवाना झाले आहेत.

260721\26_2_bed_5_26072021_14.jpg

समता परिषद