Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 14:35 IST2025-09-27T14:32:18+5:302025-09-27T14:35:07+5:30
Yash Dhaka Beed Crime News: बीडमध्ये यश ढाका या तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येने शहरात खळबळ उडालेली असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
Beed Crime Yash Dhaka Murder:गुन्हेगारीच्या घटनांमुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत केंद्रस्थानी असलेल्या बीड शहरात आणखी एक हत्या झाली. शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात यश ढाका या तरुणाची हत्या करण्यात आली. यशची हत्या करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी होत असताना त्याचा वाल्मिक कराडसोबतचा फोटो असलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यश ढाका या २२ वर्षीय इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाची चौघांनी मिळून हत्या केली. गुरुवारी (२५ सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजता गजबलेल्या चौकात त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी होत असतानाच यश ढाकाचा वाल्मिक कराडसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे.
यश ढाकाचा वाल्मिक कराडसोबत फोटो, 'मेरे दोस्त तेरा क्या होगा?'
हत्या करण्यात आलेल्या यश ढाकाचा जुना फोटो व्हायरल होत आहे. तो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसोबत यश ढाका दिसत आहे. एका कार्यालयातील हा फोटो असून, वाल्मिक कराड खुर्चीवर बसलेला असून, यश शेजारी उभा आहे.
याच फोटोचा एका हिंदीतील संवादासोबत व्हिडीओ बनवण्यात आलेला आहे. 'मैं अपने आप को पुलिस के हवाले कर रहा हूँ, अपने पैसे, अपने दबदबे, अपने बल से मैं तो छुट जाऊंगा लेकिन तेरा क्या होगा मेरा दोस्त, तेरा क्या होगा?', असा हा संवाद आहे. हाच व्हिडीओ यश ढाकाच्या हत्येनंतर व्हायरल झाला आहे.
गुन्हेगारीच समर्थन नाहीच टोळी कोणाची हे शोधावंचं.. त्यांना शिक्षा व्हावी.. 💯@BEEDPOLICE
— Amol Aswale (@AmolAswale7) September 26, 2025
सोज्वळ पत्रकाराचा सोज्वळ मुलगा..!?
👇🏻#beedhttps://t.co/FNGRN5dNu3pic.twitter.com/bl6inMKd9K
बीडमध्ये खुनांची मालिका सुरूच
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून खुनांची मालिका सुरूच आहे. किरकोळ कारणांवरूनही लोक एकमेकांच्या जिवावर उठत आहेत. याची कारणे वेगवेगळी असली तरी वारंवार खून होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
गुन्हेगारी थांबता थांबेना
जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबत नसल्याचे दिसत आहे. यापूर्वी मारहाण करून व्हिडीओ काढल्याचे प्रकार घडले होते.
दोन दिवसांपूर्वीच माजलगावात प्रा. लक्ष्मण हाके यांच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाला. अशा अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. असे असतानाही पोलिसांकडून गंभीर गुन्हे घटल्याचा दावा होत आहे.
विशेष म्हणजे, खुनांची ही मालिका सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही १७सप्टेंबर रोजीच्या भाषणात गंभीर गुन्हे घटल्याचा दावा केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले.