खेळताना मुलांना सापडले चांदीच्या नाण्यांचे गाडगे; सांगवीतील 'त्या' जागेत खजिना दडल्याची चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 18:45 IST2026-03-02T18:44:52+5:302026-03-02T18:45:59+5:30

वन रुपी इंडिया १९४१! सांगवीत सापडलेल्या ४-५ किलो चांदीच्या नाण्यांचे गौडबंगाल

Beed: 250 Silver Coins from 1941 Found During House Excavation in Sangvi; Archeology Dept Probe Likely | खेळताना मुलांना सापडले चांदीच्या नाण्यांचे गाडगे; सांगवीतील 'त्या' जागेत खजिना दडल्याची चर्चा!

खेळताना मुलांना सापडले चांदीच्या नाण्यांचे गाडगे; सांगवीतील 'त्या' जागेत खजिना दडल्याची चर्चा!

- नितीन कांबळे
कडा (जि. बीड):
आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे एका घराच्या बांधकामासाठी काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात १९४१ सालची ब्रिटीशकालीन चांदीची नाणी सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी खेळणाऱ्या मुलांच्या हाताला हा 'खजिना' लागला असून, प्रशासनाने आतापर्यंत २५० नाणी जप्त केली आहेत. मात्र, या जागेत जमिनीखाली अजूनही मोठा साठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुलांनी खिशात भरली नाणी अन्...
शशिकांत नारायण खुटाळे यांच्या नवीन घराच्या पायाचे खोदकाम सुरू असताना मातीचे ढिगारे बाजूला टाकले होते. शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर काही मुले तिथे खेळत असताना, माती बाजूला होऊन एक गाडगे दिसले. त्यातून नाणी बाहेर पडल्याने मुलांनी ती खेळण्याचे पैसे समजून खिशात भरली. हा प्रकार घरमालकाच्या लक्षात येताच त्यांनी मुलांना दमदाटी करून नाणी काढून घेतली, ज्याची गावभर चर्चा झाली.

प्रशासनाची कारवाई आणि जप्ती
'लोकमत'ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तातडीने धाव घेतली. पहिल्या दिवशी ९८ आणि दुसऱ्या दिवशी १५२ अशी एकूण २५० नाणी जप्त करण्यात आली आहेत. या नाण्यांवर "One Rupee India 1941" असा उल्लेख असून ती शुद्ध चांदीची असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुरातत्व विभागाच्या निर्णयाकडे लक्ष
"या जागेत आणखी मोठा खजिना असू शकतो, त्यामुळे प्रशासनाने मुळापर्यंत जाऊन चौकशी करावी," अशी मागणी शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दीपक सोनवणे यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांनी सांगितले की, "पोलिसांकडून पुरातत्व विभागाला अहवाल गेल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उत्खननाबाबत निर्णय घेतला जाईल."

Web Title : खेलते समय बच्चों को चांदी के सिक्के मिले; सांगवी में खजाने की चर्चा

Web Summary : सांगवी में खेलते समय बच्चों को ब्रिटिश काल के चांदी के सिक्के मिले। अधिकारियों ने 1941 के 250 सिक्के जब्त किए, जिससे खजाने की खोज की अटकलें तेज हो गईं। पुरातत्व विभाग द्वारा आगे की जांच लंबित है।

Web Title : Children Find Silver Coins; Treasure Hunt Buzz in Sangavi

Web Summary : Children in Sangavi found British-era silver coins while playing. Authorities seized 250 coins dated 1941, sparking treasure hunt speculation. Further investigation by archaeology department is pending.