शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांसाठी बेड्‌स उपलब्ध; पण पैसे मोजूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST

बीड : बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. औषधोपचारासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. उपाययोजना सुरू आहेत. ...

बीड : बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. औषधोपचारासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. उपाययोजना सुरू आहेत. बीड जिल्ह्यात सध्या एकूण २४८७ बेड्‌स आहेत. त्यापैकी ४०४ बेड्‌स खासगी कोरोना रुग्णालयांत उपलब्ध असले तरी त्यासाठी दररोज चार हजार ते नऊ हजारांपर्यंत एका बेडसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. आजची परिस्थिती बघितली तर २४८७ बेड्‌सपैकी १५६९ बेड्‌स हे रिकामे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ऑक्सिजनचे शासकीय रुग्णालयात १५४३, खासगी रुग्णालयात ३०७ बेड्‌स आहेत. यापैकी १०८० बेड्‌स रिकामे आहेत. आयसीयूचे शासकीय २७० तर खासगीत ७८ बेड्‌स आहेत. यापैकी २०० रिकामे आहेत. व्हेंटिलेटरची संख्या शासकीय २७० तर खासगी रुग्णालयात १९ आहेत. यापैकी २८९ बेड्‌स रिकामे आहेत.

खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेडसाठी प्रतिदिन ४००० रुपये, आयसीयू बेडसाठी साडेचार हजार रुपये तर व्हेंटिलेटर बेडसाठी प्रतिदिन नऊ हजार रुपये शासकीय दर आहेत. शिवाय इतर आरोग्य सेवेचे दर वेगळेच असतील. हे सर्व टाळण्यासाठी मास्क वापरावा, सुरक्षित अंतर ठेवावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. हे केले तर आपली कोरोनापासून मुक्तता होऊ शकते.

बीड जिल्ह्यातील एकूण बेड्‌सची आकडेवारी

ऑक्सिजन बेड

शासकीय १५४३

खासगी ३०७

रिकामे १०८०

आयसीयू बेड

शासकीय २७०

खासगी ७८

रिकामे २००

व्हेंटिलेटर बेड

शासकीय २७०

खासगी १९

रिकामे २८९

शासनमान्य खासगीत बेड्‌सचे दर

ऑक्सिजन बेड ४०००

आयसीयू बेड ४५००

व्हेंटिलेटर बेड ९०००

एकूण बेड्‌स २४८७ रिकामे बेड्‌स १५६९

शासकीय एकूण २०८३ रिकामे १४५९

खासगी एकूण ४०४ रिकामे ११४