शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई-शिरसाळा रस्त्यावरील डांबरीकरण उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : अंबाजोगाई-शिरसाळा रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. डोंगरमाथ्यातल्या नागमोडी वळण रस्त्यावरचे डांबर पूर्णपणे उखडले असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : अंबाजोगाई-शिरसाळा रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. डोंगरमाथ्यातल्या नागमोडी वळण रस्त्यावरचे डांबर पूर्णपणे उखडले असून रस्ता खड्डेमय बनला आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचला असून दगड, खडी रस्त्यावर पडली आहे.

पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर दगड, धोंडे वाहून आले आहेत. यामुळे वाहने घसरुन अपघात होत आहेत. या रस्त्याचे काम तकाळ मार्गी लावण्याची मागणी वाहनधारक करीत आहेत.

अंबाजोगाई ते सिरसाळा या रस्त्याला कुरणवाडी, येल्डा, चिंचखंडी, मंगाईवाडी, ममदापूरसह डोंगरातील अनेक गावांची वर्दळ या रस्त्याला असते. या रस्त्याचे काम कित्येक महिन्यापासून संथगतीने सुरु आहे. वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत वाहन चालवावे लागत आहे. याच रस्त्यावर मुकुंदराज स्वामी महाराज मंदिराच्या डोंगरात नागमोडी व वळण रस्ता हा धोकादायक असलेला घाट रस्ता आहे. नागमोडी वळण असलेल्या रस्त्याचे डांबर उखडून खड्डे पडले आहेत. रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांना अंबाजोगाई बाजारपेठेत येण्यासाठी ऑटोरिक्षाने प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकाला नागमोडी वळण रस्ता पार करणे तारेवरची कसरत बनला आहे.

या रस्त्याचे काम औरंगाबादच्या ऐश्वर्या कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीच्या वतीने रस्त्यावर अनेक गुत्तेदार काम करीत आहेत. या रस्त्याचे काम वाहनधारकांच्या सेवेसाठी नाही तर गुत्तेदाराच्या मर्जीने चालत असल्यामुळे कित्येक महिन्यांपासून या रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे. या रस्त्यावर एखाद्याचा बळी गेल्यावरच या रस्त्याचे काम पूर्ण होणार का? असा संतप्त सवाल वाहनधारक करीत आहेत. या रस्त्याच्या कामाकडे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

.....

या रस्त्यावरुन व नागमोडी घाटातून मालट्रकसारखे वाहने चालविणे तारेवरची कसरत बनली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. दगड, गोटे रस्त्यावर वाहून आले आहेत. घाट कधी संपेल याकडे लक्ष असते. या रस्त्याचे काम लवकर मार्गी लावण्याची गरज आहे.

-दत्ता मुंडे, ममदापूर, परळी, वाहनधारक.

===Photopath===

200621\avinash mudegaonkar_img-20210618-wa0058_14.jpg