शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर देणाऱ्यास विचारा लस घेतली का? धारूर शहरात ५० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : धारूर व केज येथे सिलिंडर घरपोहोच करणारी एकच एजन्सी आहे. पंधरा हजारांपेक्षा जास्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : धारूर व केज येथे सिलिंडर घरपोहोच करणारी एकच एजन्सी आहे. पंधरा हजारांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. १६ डिलिव्हरी बॉईज घरपोच सिलिंडर पोहोच करण्याचे काम करतात. मात्र, यापैकी आठ डिलिव्हरी बॉईजनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. आणखी आठ डिलिव्हरी बॉईज लसीकरणापासून वंचित आहेत. यातील एजन्सीच्या तीन डिलिव्हरी बॉईजनी कोरोनावर मात केली आहे.

गॅस एजन्सीचे व्यवस्थापन धारूर कार्यालयातून सांभाळले जाते. कोरोनाकाळात नागरिकांना वेळेवर गॅस घरपोच मिळवा, यासाठी १६ डिलिव्हरी बॉईज नियुक्त केले आहेत. पंधरा हजारांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. घरपोच गॅस सिलिंडर पोहोच करणाऱ्या १६ डिलिव्हरी बॉईजसह सर्व ३० जण या एजन्सीत कार्यरत आहेत. यातील घरपोच सिलिंडर पोहोच करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्य व सुरक्षिततेला जास्त महत्व दिले जाते. हे कर्मचारी मास्क, सॅनिटायजर वापरतात. यापैकी पन्नास टक्के म्हणजे आठ डिलिव्हरी बॉईजचे लसीकरण करण्यात आले आहे. कार्यालयीन कर्मचारीवर्गाचे लसीकरण झाले असून, राहिलेल्या कर्मचारी वर्गाच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे एजन्सीचे व्यवस्थापक सुनील भोसले यांनी सांगितले.

...

सिलिंडर सॅनिटाईज केले जाते

गॅस सिलिंडर घरपोच करणाऱ्यांपैकी तीन डिलिव्हरी बॉईज कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी कोरोनावर मात केली आहे. ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. सिलिंडर घर पोहोच करताना एजन्सीकडून ग्राहक व कर्मचारी दोघांच्याही सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. डिलिव्हरी बॉईज मास्क, सॅनिटायझर वापरतात. हॅण्डग्लोव्हज वापरतात. ग्राहकांच्या घरात सिलिंडर ठेवताना ते सॅनिटाईज करून ते दिले जाते, असेही सुनील भोसले यांनी सांगितले.

....

लसीकरणासाठी आरोग्य विभागास पत्रव्यवहार

गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी बॉईजचा थेट ग्राहकांशी संबंध येतो. यामुळे या डिलिव्हरी बॉईजचे लसीकरण व्हावे. त्यांची व नागरिकांची दोघांच्या सुरक्षिततेचा विचार करून आरोग्य विभागास गॅस एजन्सीकडून यादी घेऊन त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, असे पत्र आरोग्य विभागास दिल्याचे नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी सांगितले.

....

डिलिव्हरी बॉईज म्हणतात...

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून घरपोहोच गॅस सिलिंडर देण्याचे काम करतो. आमच्या एजन्सीमधील केज येथे काम करणाऱ्या सहकाऱ्यास लस मिळाली. तशी आम्हाला तत्काळ लस देऊन आमचे व आमच्या कुटुंबाचे रक्षण करावे.

- दत्ता सिरसट, धारूर.

...

गेल्या चौदा महिन्यांपासून गॅस ग्राहकांची सोय व्हावी, यासाठी आम्ही घरपोहोच सिलिंडर देत आहोत. एजन्सीकडून जिल्हाधिकाऱ्यांना लसीकरणाबाबतचे पत्र देऊन यादी दिली आहे. आरोग्य विभागाने आमची सेवा व संपर्क पाहून आम्हाला तत्काळ लस द्यावी.

-शेख अन्वर, धारूर.