शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

विषय समिती निवडीवरून भाजप नगरसेविकांच्या नातेवाईकांमध्ये हमरीतुमरी, माजलगाव नगर परिषदेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 14:57 IST

माजलगाव नगर परिषदेत पिठासीन अधिकाऱ्यांसमोरच घडला प्रकार

ठळक मुद्देविषय समित्यांची बिनविरोध निवडी झाली

माजलगाव : नगर परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या विषय समिती निवडणुकीत भाजप नगरसेविकांच्या नातेवाईकांनी आपसातच मोठा गदारोळ केल्याचा प्रकार पीठासीन अधिकारी यांच्यासमोर घडला. दरम्यान, शेवटी बिनविरोध समित्यांची निवड करण्यात आली आहे.

शुक्रवारी येथील नगर परिषद सभागृहात विविध विषय समित्यांच्या निवडीसाठी बैठकीचे आयोजन पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड व मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. त्यावेळी सभागृहात नगरसेविका ऐवजी त्यांची मुले, पती हेच उपस्थित होते. महिला भाजप नगरसेवकांच्या या नातेवाईकांनी निवडीत कोणाचे नाव द्यायचे यावरून आपसातच एकमेकांच्या अंगावर धावून गदारोळ केला. सुमारे दहा मिनिटे हा प्रकार सुरू होता अखेर काही नगरसेवक व मुख्याधिकारी भोसले यांनी उठून मध्यस्थी केली. त्यानंतर काही अनुपस्थित असलेल्या महिला नगरसेविकाना घरून बोलावण्यात आले व नंतर बैठक झाली. 

यांची झाली निवडदरम्यान, बांधकाम सभापती - रोहन घाडगे, पाणीपुरवठा सभापती- शरद यादव, महिला व बालकल्याण सभापती- उषा बनसोडे, स्वच्छता सभापती-  सुमन मुंडे, शिक्षण सभापती- सय्यद राज अहमद, स्थायी समिती सदस्य म्हणून भागवत भोसले, तालेब चाऊस, स्वाती सचिन डोंगरे यांची निवड झाली. 

टॅग्स :BeedबीडElectionनिवडणूक