शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

परिवर्तनाचा लढा; रूढी परंपरा मोडीत काढत महिलांनी केला मारुती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 4:35 PM

अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील महिलांच्या धाडसी निर्णयाचे सर्वत्र स्वागत

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई-  तालुक्यातील  धानोरा (बुद्रुक) येथील  महिलांनी रविवारी सकाळी एकत्रित येऊन मारुती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. वर्षानुवर्षे प्रवेशासाठी मज्जाव असणारी ही रूढी-परंपरा आज महिलांनी संघटित होऊन मोडीत काढली. ग्रामीण भागातील महिलांनी संघटित होऊन पुकारलेल्या या  परिवर्तनाच्या लढ्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.

धानोरा गावातील महिला मंडळाच्या बैठकीत महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नसणे आणि पुरुषांना प्रवेश असणे म्हणजे लिंगाच्या आधारावर होणारा भेदभाव आहे. महिलांना केवळ मासिक पाळी येते आणि त्या काळात तिला विटाळ म्हणून लांब ठेवणे योग्य नाही. तर महिलेच्या मासिक पाळीमुळे सर्वांच्या जन्माची वेळ येते. त्यामुळे मासिक पाळीला आनंदाने समाजाने स्वीकारले पाहिजे. असे मत गावातील सामाजिक कार्यकर्त्या  आशालता आबासाहेब पांडे यांनी व्यक्त केले. 

त्यांनी  गावातील सर्व महिलांना संघटित करून हा लढा उभारला. मासिक पाळी मध्ये विटाळ नसतो तर टी एक नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे मंदिरात प्रवेश केल्याने देवाला विटाळ होत नाही. तर माणसांनी तयार केलेली हि प्रथा आज पासून बंद करण्याचा निर्णय गावातील महिलांनी केला. रविवारी सकाळी  आशालता आबासाहेब पांडे, चित्रा बाळासाहेब पाटील यांनी निश्चिय व्यक्त करून महिलांना सोबत घेत मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि मारूतीच्या गाभाऱ्यात जाऊन नारळ फोडले.

महिलांना मज्जाव असतो ही पिढ्यां न पिढ्यांनपासून  चालत आलेली प्रथा परंपरा आज महिलांनी मोडीत काढली. मारोती हा ब्रह्मचारी आहे, तसेच नारळ हे फक्त पुरुषांनीच फोडायचे, या सामाजिक व्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न आज धानोरा  बु. येथील एकल महिला संघटनेच्या कार्यकर्त्या आशालता आबासाहेब पांडे व चित्रा बाळासाहेब पाटील व महिला मंडळातील सर्व महिलांनी केला आहे.

महिला आहे म्हणूनच सगळं आहे. ती स्वतः एक जननी आहे. मग तिलाच या प्रथा का बाळगाव्या लागतात. एकल महिला संघटना ही महिलांना मान सन्मान व ती आर्थिक , सामाजिक , राजकीय शैक्षणिक , सांस्कृतिक स्तरावर स्वतंत्र होण्यासाठी काम करते. आम्हाला पण भारतीय संविधानाने अधिकार दिला आहे. त्या अधिकाराचा वापर करून आगामी काळात ही महिलांचे मजबूत संघटन करून जुन्या प्रथा, अंधश्रद्धा मोडीत काढू-:आशालता पांडे,सामाजिक कार्यकर्त्या,अंबाजोगाई.

टॅग्स :TempleमंदिरWomenमहिलाAmbajogaiअंबाजोगाई