वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:32 IST2021-03-28T04:32:04+5:302021-03-28T04:32:04+5:30

आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव शिवारातील कढी नदीतून वाळूचा अवैध उपसा करून ट्रॅक्टर व जेसीबीच्या साहाय्याने अवैध वाहतूक करण्यात येत असल्याची ...

Action on sand dredging tractor | वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव शिवारातील कढी नदीतून वाळूचा अवैध उपसा करून ट्रॅक्टर व जेसीबीच्या साहाय्याने अवैध वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मंडळ अधिकारी शिवशंकर शिंगणवाड, तलाठी अनिल पवने, आकाश डोहे, कोतवाल कुंदन बावरे यांना मिळाली. तात्काळ पथकासह कढी नदीमध्ये ते पोहोचले. त्यांना दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास सदर नदीपात्रात ट्रॅक्टर व जेसीबीच्या साह्याने वाळूचा उपसा करताना आढळून आले. पथक आरोपीच्या लक्षात येताच जेसीबी चालकाने जेसीबीसह व ट्रॅक्टर चालकाने तिथून पळ काढला. मात्र, नदीपात्रातून एक ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले आहे. सदर ट्रॅक्टर वाळूसह ताब्यात घेत मंडळ अधिकारी व पथकाने तहसील कार्यालयात दंडात्मक कारवाईसाठी जमा केले. ही कारवाई मंडळ अधिकारी शिवशंकर शिंगणवाड, तलाठी अनिल पवने, आकाश डोहे, कोतवाल कुंदन बावरे पथकाने केली.

Web Title: Action on sand dredging tractor