चोरटी विक्री करणाऱ्या गुटखा, दारू माफियांवर कारवाई; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:51+5:302021-07-03T04:21:51+5:30

सिरसाळासह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरी छुपके खुलेआम अवैध धंदे जोरात चालू होते. याची माहिती सिरसाळा पोलीस स्टेशनचे ...

Action against smuggled gutkha, liquor mafias; Charges filed against six | चोरटी विक्री करणाऱ्या गुटखा, दारू माफियांवर कारवाई; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

चोरटी विक्री करणाऱ्या गुटखा, दारू माफियांवर कारवाई; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

सिरसाळासह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरी छुपके खुलेआम अवैध धंदे जोरात चालू होते. याची माहिती सिरसाळा पोलीस स्टेशनचे एपीआय एकशिंगे यांना समजल्यानंतर त्यांनी अवैध धंदे चालवणाऱ्यांवर नजर ठेवून येथील पोहनेर रोडवर चोरी छुपके अवैध गुटखा विक्री करणाऱ्या भगवान साबळे, अन्वर शेख व रामनगर तांडा पिंपरी येथील साहेबराव चव्हाण, वांगी फाटा, आचार्य टाकळी गावठी दारू विक्री करणाऱ्या गणेश किरवले, सुनील जाधव अशा सहाजणांविरुद्ध विविध कलमानुसार एकूण ४९,४६० रुपये मुद्देमाल रक्कम जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन महिन्यांपूर्वीच सिरसाळा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर एपीआय प्रदीप एकशिंगे यांनी सिरसाळ्यातील माफियागिरी, गुन्हेगारी बंद करून धडाकेबाज कार्यवाही सुरू केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या मिश्रण रसायनाच्या सेवनामुळे कित्येक कुटुंब उद्‌ध्वस्त होऊन रस्त्यावर आल्याचे दिसत आहे.

Web Title: Action against smuggled gutkha, liquor mafias; Charges filed against six