'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 15:08 IST2025-10-02T14:50:14+5:302025-10-02T15:08:43+5:30
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळ्याव्याला मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. यावेळी आमदार धनंजय मुंडेही उपस्थित होते.

'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळ्याव्याला मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. यावेळी आमदार धनंजय मुंडेही उपस्थित होते, यावेळी त्यांनी भाषणात शायरी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाचा उल्लेख केला. तसेच मंत्रिपदाची खंतही बोलून दाखवली.
"शेतकरी अडचणीत आहे, इथे आलेला प्रत्येकजण शेतकरी आहे, आज मी मंत्रीमंडळात नाही, फक्त आमदार आहे. माझी बहिण मंत्रीमंडळात आहे, शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत पंकजा मुंडेंनी मिळून दिल्याशिवाय राहणार नाही", असे धनंजय मुंडे म्हणाले. आजच्या पंकजाताईंनी सुरू केलेल्या दसऱ्या अभुतपूर्व गर्दी आज झाली आहे. पंकजा मुंडेंनी त्यांच्या भाषणात उल्लेख करावा की आजपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा आजपर्यंतचा सर्वात अभूतपूर्व मेळावा कोणता असेल तर तो आजचा मेळावा आहे. आपण एवढे प्रेम मुंडे कुटूंबावर दाखवले नतमस्तक होऊन प्रणाम करतो. पाऊस आला, पूर आला भयंकर शेतकऱ्यांसमोर संकट आले, तसले संकट असताना माझी आणि ताईंची चर्चा झाली आपण काय करावे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
शायरीतून सगळेच बोलून दाखवले
"मला माझ्या बहिणींचा अभिमान वाटतो, साहेब गेल्यानंतर सुध्दा असंख्य अडचणीत सुध्दा पंकजाताईंनी सार्थ परंपरा पुढे ठेवली. मी देवाण-घेवाण बघत असताना पुढे आलो, मागे बघितले, मागच्या दसऱ्याला मी होतो, त्यातले अनेकजण मागे दिसतात. त्यांना वाटत पुढे निवडणूका नाहीत. काहीजण म्हणले, मुंडे साहेबांचे सगळे संपले, असे म्हणत मैने सोचा की इस सफर करते हूए खामोश रहाना सही हैं...कुछ भी नहीं करता बहोत गालीयां खाई हैं, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी शायरीतून सगळेच बोलून दाखवले. "आग लगी थी मेरे घर,सब पुछने वाले आये हाल पूछा और चले गये. एक सच्चे मित्र ने पूछा क्या बचा है? मैने कहाँ कुछ नहीं केवल मैं बचा गया हूँ. फिर उसने गले लगा कर कहाँ दोस्त.फिर जला ही क्या हैं?, अशी शायरी मुंडे बोलले.
'मराठा आरक्षण दिल्याने आनंद'
ज्यावेळी आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळी मी प्रत्येकवेळी भांडलो आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले याचा आम्हाला आनंद आहे. मीही त्या चळवळीत होतो. काहींना मराठा आरक्षणाच्या आडून ओबीसींचे आरक्षण घ्यायचे आहे, ओबीसींचे कटऑफ ४८५ आणि स्पेशल विकर सेशनचा कट ऑफ ४५० मार्क आहेत. मी जर मराठा समाज म्हणून ईडब्लूसच आरक्षण घेतलं, तर पास झालो असतो. प्रमाणपत्र घेवून ४८० मार्क घेऊन सुध्दा नापास, कुणाला फसवताय. काही ठरावीक लोक खुर्ची मिळावी म्हणून, राजकारण करत आहेत, असंही मुंडे म्हणाले.