शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
5
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
6
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
7
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
8
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
9
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
10
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
11
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
12
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
13
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
14
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
15
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
16
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
17
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
18
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
19
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
20
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
Daily Top 2Weekly Top 5

काळवटी तलावात पोहताना १५ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 14:13 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंबाजोगाई शहर कार्यवाह वशिष्ठ भोसले यांच्या कुटुंबावर शोककळा

ठळक मुद्देवशिष्ठ भोसले हे नेहमी त्यांच्या मुलांना घेऊन पोहण्यासाठी काळवटी तलावात जात असत. बुधवारी सकाळी देखील ते मुलगी वैष्णवी आणि मुलाला घेऊन पोहण्यासाठी गेले होते.

अंबाजोगाई : शहरापासून जवळच असणाऱ्या काळवटी तलावात पोहत-पोहत दूरपर्यंत गेलेली वैष्णवी वशिष्ठ भोसले (वय १५) ही मुलगी पाण्यात बुडाली. तिला तातडीने बाहेर काढून स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (२६ मे) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. वैष्णवी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंबाजोगाई शहर कार्यवाह वशिष्ठ भोसले यांची मुलगी होती.

वशिष्ठ भोसले हे नेहमी त्यांच्या मुलांना घेऊन पोहण्यासाठी काळवटी तलावात जात असत. बुधवारी सकाळी देखील ते मुलगी वैष्णवी आणि मुलाला घेऊन पोहण्यासाठी गेले होते. वैष्णवीला चांगले पोहता येत असल्याने तिने पाण्यात उडी मारली. पोहत-पोहत ती तलावात बरीच दूरपर्यंत गेली. परंतु, दमल्यामुळे ती पाण्यात बुडाली असा अंदाज आहे. वैष्णवी बुडत असल्याचे पाहून वशिष्ठ भोसले, कृष्णा लोखंडे आणि अन्य काही तरुणांनी तातडीने पोहत पोहत तिच्याकडे जाऊन तिला पाण्याबाहेर काढले. परंतु, शरीरात पाणी गेल्यामुळे वैष्णवी अत्यवस्थ झाली होती. तिला तत्काळ स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. थोडा वेळ ती शुद्धीत आली आणि बोलली देखील होती अशी माहिती सूत्रांनी दिली. परंतु नंतर तिची तब्येत अधिक खालावली आणि तिचा मृत्यू झाला. 

परोपकारी पित्याची गुणी मुलगीसंघाचे शहर कार्यवाह वशिष्ठ भोसले यांनी कोरोनाच्या काळात त्यांच्या गावाकडून येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी यासाठी मेंढी फार्म परिसरातील स्वतःचे राहते घर रिकामे करून दिले. या अडचणीच्या काळात जमेल ती मदत ते सर्वांना करत आहेत. अशा परोपकारी पित्याची मुलगी वैष्णवी ही देखील गुणवान होती. वैष्णवी नुकतीच दहावीतून ११ वीच्या वर्गात जाणार होती. शिक्षणासोबतच इतर क्षेत्रातही ती अग्रेसर होती. परोपकारी पित्याच्या गुणी मुलीच्या निधनाने सर्वत्र हळहल व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड