शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

केज हादरले! ८ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ८ महिने अत्याचार, 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 18:03 IST

१ सप्टेंबरपासून सुरू होता अत्याचाराचा सिलसिला! केज तालुक्यातील धक्कादायक प्रकार

केज (जि. बीड): तालुक्यातील एका गावात सालगडी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या आठ महिन्यांपासून सातत्याने अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी राहुल भालशंकर (रा. जि. बुलढाणा, ह.मु. केज) याने लग्नाचे आमिष दाखवून आणि वडिलांना जिवंत मारण्याची धमकी देऊन पीडितेचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष अन् धमकीचा धाकमिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे वडील आणि आरोपी राहुल हे दोन्ही मूळचे विदर्भातील असून केज परिसरात वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणून काम करतात. ओळखीचा फायदा घेत राहुलने १ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री पहिल्यांदा अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडिता दहशतीत होती.

पिंक पथकाकडून तपास सुरूहा अत्याचाराचा सिलसिला १४ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू होता. अखेर पीडितेने धाडस करून हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर केज पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुन्हा नोंदवला. आरोपी फरार असून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड