शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

​चेहऱ्याच्या ‘ग्लो’साठी वापरा चंदन पावडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 18:00 IST

आज प्रत्येक तरुणीला आपला चेहरा ग्लो दिसावा असे वाटते. त्यासाठी अनेक उपाययोजनाही केल्या जातात. अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो. मात्र त्यातीलच चंदन पावडर आपल्या चेहऱ्याच्या ग्लोसाठी एक उत्तम पर्याय ठरु शकतो.

आज प्रत्येक तरुणीला आपला चेहरा ग्लो दिसावा असे वाटते. त्यासाठी अनेक उपाययोजनाही केल्या जातात. अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो. मात्र त्यातीलच चंदन पावडर आपल्या चेहऱ्याच्या ग्लोसाठी एक उत्तम पर्याय ठरु शकतो. चंदन पावडरच्या वापराने त्वचा केवळ मऊ आणि चमकदारच होत नाही तर त्यासोबत त्वचेच्या इतर समस्याही कमी होतात. चंदन पावडर लावण्याचे फायदे अनेकांना माहितच असतात,  पण ती पावडर कशी लावावी, याची माहिती खूप कमी जणांना असते. यामुळे चुकीच्या पद्धतीने पावडर लावली जाते आणि त्याचे परिणामकारक फायदे मिळत नाही. जर तुम्हाला चंदन पावडरचा हवा तसा परिणाम पाहिजे असेल खालील योग्य पद्धतीने चंदन पावडरचा वापर करावा.  प्रथम एक चमचा चंदन पावडर घ्या किंवा चंदन पावडर नसेल तर चंदनाचे लाकुड दगडावर घासून ओले करुन घ्या. त्यानंतर त्यात एक चमचा दूध किंवा गुलाबजल टाका. त्यात हळदही टाकू शकतात. हळदीत अ‍ॅटी-सेप्टीक गुण असतात. दुधामुळे चेहऱ्याच्या त्वचेला मऊपणा प्राप्त होतो आणि गुलाबजलमुळे फ्रेशनेस येतो. हळदीचा वापर करायचा नसल्यास काही हरकत नाही. पूर्ण चेहऱ्यावर एक प्रकारे पेस्ट लाऊन घ्या. पेस्ट सगळीकडे समप्रमाणात लागली आहे ना, याकडे लक्ष द्या.पेस्ट वाळत नाही तोपर्यंत चेहरा धुऊ नका. कमीत-कमी २० मिनिटांनंतर चेहरा धुऊन घ्या. यानंतर चेहरा मऊसर कापडाने पुसून घ्या. तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो स्पष्ट जाणवेल. हा उपाय आठवड्यातून एकदा जरी केला तरी त्याचे परिणाम लवकरच दिसायला लागतील.