शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

​सुंदर दिसण्यासाठी मानेची घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 16:59 IST

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी बऱ्याच महिला ब्युटीपार्लरमध्ये जातात व आपला चेहरा सुंदर करतात. मात्र, आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी चेहऱ्याप्रमाणेच मानेची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

-Ravindra Moreआपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी बऱ्याच महिला ब्युटीपार्लरमध्ये जातात व आपला चेहरा सुंदर करतात. मात्र, आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी चेहऱ्याप्रमाणेच मानेची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. सूर्यप्रकाश, प्रदूषण अशा बऱ्याच कारणांमुळे मानेभोवती धूळ साचून टॅन तयार होतो. त्याचप्रमाणे सुरकुत्याही येतात. यामुळे मान आपले सौंदर्य खराब करते. एकंदरीत याचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होतो. आजच्या सदरात आपण आपले सौंदर्य खुलविण्यासाठी मानेची काळजी कशी घ्याल याबाबत जाणून घेऊया...* मानेच्या स्वच्छतेअभावी आपल्या सौंदर्यात बाधा येत असेल तर लिंबूवर्गीय फळांचा वापर नक्की करा. कारण लिंबामध्ये व्हिटॅमिन ‘सी’हे नैसर्गिक ब्लिचिंग क्वालिटी तत्त्व आहे. त्यासाठी लिंबू मिठात बुडवून हळुवार मानेभोवती चोळावे आणि त्यानंतर १५ मिनिटांनी आंघोळ करावी. जर तुमची त्वचा नाजूक असेल तर लिंबाचा रस गुलाब पाण्यात मिक्स करून मानेला लावा.* घट्ट दुधात दोन चमचे टॅँगरिन पावडर घेऊन ते मिक्स करा व त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेभोवती लावून कोरडी झाल्यानंतर धुवा. यामुळे आपल्या मानेचे पर्यायी चेहऱ्याचे सौंदर्य खुलण्यास मदत होते. * घट्ट मिल्क क्रिम किंवा दह्यात दोन ते तीन चमचे ओट्स पावडर घ्या आणि मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करा. टोमॅटोच्या गरामध्ये मध मिक्स करा. हे मिश्रण मानेभोवती लावा आणि सुकल्यानंतर आंघोळ करा. तीन दिवसातून एकदा असे केल्यास चांगला रिझल्ट दिसून येतो. * नैसर्गिक त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी बटाटादेखील महत्त्वाची भूमिका बजावतो. बटाट्याला स्कीन लाईटर म्हणून वापरता येतो. यासाठी बटाट्याचे दोन स्लाईस घ्या आणि दहा मिनिटे ते मानेभोवती चोळा. तीन दिवसातून एकदा असे केल्यास मानेभोवतालचा त्वचा टोनमध्ये बराच फरक जाणवतो.* मान काळी पडण्याचे मुख्य कारण म्हणजे मृत पेशी साचणे होय. या मृत पेशी काढण्यासाठी काकडीचा उपयोग सर्वाेत्तम आहे. यासाठी काकडीचा गर पॅक म्हणून मानेवर लावू शकता. हा पॅक सुमारे १५ मिनिटांनी धुवून त्यावर गुलाब पाणी लावा. तसेच केवळ आॅलिव आॅईलमध्ये मिक्स करुन पॅक बनवा आणि हा पॅक मानेभोवती लावा. यामुळे मानेभोवतालची त्वचा उजळण्यास मदत होईल.* त्वचेचा टोन वाढविण्यासाठी दुधाच्या सायमध्ये देखील क्षमता आहे. यासाठी थोडी साय घेऊन ती मानेवर लावा व हळूवार मसाज करा. त्यानंतर थोड्यावेळाने कोमट पाण्याने धुवा. एक दिवस आड असे करत राहिल्यास त्वचेमध्ये बराच फरक झालेला जाणवेल. कोरफडचा गर मानेवर लावल्यासही त्याचा चांगला उपयोग होतो.