शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

​आॅफिसमधील ‘केक कल्चर’ आरोग्यास घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 13:16 IST

‘केक कल्चर’ आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकते, असे प्रा. नायजेल हंट सांगतात.

आॅफिसमध्ये सहकर्मचार्‍याचा वाढदिवस असेल तर सहाजिकच सर्वजण मिळून तो साजरा करतात. अनेक कंपन्यांमध्ये तर कर्मचाऱ्यांचे वाढदिवस, वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी केक कापून साजरी करण्याची प्रथाच असते.परंतु हे ‘केक कल्चर’ आरोग्या अत्यंत घातक ठरू शकते, असे प्रा. नायजेल हंट सांगतात.‘रॉयल कॉलेज आॅफ सर्जन्स’च्या दंतचिकित्सा विभागाचे सदस्य असणारे प्रा. हंट दंतवैद्यांसाठी आयोजित वार्षिक स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात बोलत होते.‘केक कल्चर’मुळे लठ्ठपणा आणि दातांचे अनेक आजार होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. त्यामुळे केकऐवजी फळे, नट्स किंवा चीज खाण्याचा सल्ला ते देतात.आपल्या भाषणात ते म्हणाले, वजन कमी करण्याच्या इच्छेला केक कल्चरमुळे अडसर निर्माण होतो. जे लोक अगदी मनापासून वजन कमी करण्यसाठी प्रयत्नशील असतात त्यांच्यासमोर जर आॅफिसमध्ये केक आला तर त्यांच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फेरले जाते. कित्येक लोक गोड पदार्थांचे सेवन प्रामुख्याने आॅफिसातच करतात.आता याचा अर्थ असा नाही की, प्रा. हंट केकच्या एकदम विरोधात आहेत. केक आणावा पण तो कमी प्रमाणात असावा आणि तो केवळ लंचसोबत खाण्यात यावा.साखर आणि स्टार्च असणारे अन्नपदार्थ शक्यतो टाळण्याचा डेन्टिस्ट सल्ला देतात. अशा पदार्थामुळे बॅक्टेरिआ वाढून दातांना कीड लागण्यास कारणीभूत आम्ल तयार होते. म्हणून आरोग्याविषयी जागरूक होऊन कंपन्यांनी केक कल्चरला आळा घालण्याचा प्रयत्न करावा.