महिलांचा चेहरा तेव्हाच चांगला दिसतो जेव्हा पुटकुळ्या नसतात. महिलांना त्वचेवर वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. चेहऱ्याची त्वचा डागविरहीत करण्यासाठी सगळे उपाय करूनही जर त्याचा फायदा होत नसेल तर तुम्हाला काहीतरी खास उपाय करण्याची गरज असते. कारण नेहमी महागडी उत्पादनं वापरल्यामुळे  पैसे तर वाया जातात. पण त्वचेवर काही फरक पडत नाही. त्वचा निस्तेज आणि काळी पडायला सुरूवात होते. साधारणपणे मासिक पाळीच्या दिवसात आणि प्रदुषणाचा परीणाम झाल्यामुळे  त्वचेवर पुळ्या येतात.

 Image result for haldi face pack

पण तुम्हाला माहीत आहे का घरच्या वापरात सर्रास आढळत असलेल्या गोष्टींचा वापर करून तुम्ही आपल्या त्वचेचं सौदर्य उजळवू शकता आणि त्वचेवरील काळे डाग आणि पिंपल्सपासून सुटका मिळवू शकता. यासाठी हळद आणि तांदळाच्या पिठाचा वापर करून तुम्ही आपली त्वचा आणि चेहरा सुंदर बनवू शकता.  (हे पण वाचा-चमकदार आणि दाट केसांसाठी तुपाचा 'असा' वापर कराल तर ब्युटी प्रॉडक्ट्सना विसरून जाल)

Image result for haldi face pack

हळदीचा वापर तुम्ही वापरत असलेल्या सौदर्य प्रसाधनांमध्ये केलेला असतो.  हळदीचा पॅक लावल्यामुळे  तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या आणि काळपटपणा निघून जाण्यास मदत होईल.   कारण हे घरगुती वापराचे पदार्थ असल्यामुळे केमिकल्स विरहीत असतात. म्हणून कोणत्याही प्रकारचं त्वचेचं नुकसान होण्याचा धोका नसतो. 

Image result for rice flour

हळद आणि तांदळाच्या पिठाचा असा करा वापर

Image result for haldi face pack

हळदीचा पॅक तयार करत असताना १ चमचा हळदीची पावडर आणि २ चमचे तांदळाचे पीठ आणि त्यात  १ चमचा टॉमॉटोचा रस तसंच दूधाचा समावेश करा. हे मिश्रण एकत्र करा.  हा पॅक चेहरा आणि मानेला लावा. ३० मिनिटं  राहू द्या. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. तुम्ही हा प्रयोग आठवड्यातून दोनदा केल्यास फरक दिसून येईल. ( हे पण वाचा-दाबल्याने पिंपल्स कमी होतात असं वाटतं का? मग हे वाचाच)

Image result for rice flour in beauty

जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स असतील तर तुम्ही हळद आणि  तांदळाचा पॅक लावल्याने फरक जाणवेल.  यामुळे पुळकुट्या नाहीशा होतील. जर रोज कामासाठी घराबाहेर पडत असल्यामुळे तुमची त्वचा निस्तेज आणि कोरडी पडली असेल तर  तांदूळ आणि हळदीचा पॅक लावल्यास  त्वचा चमकदार दिसेल. 

Web Title: Benefits of face pack of rice and turmeric to the facial skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.