दाबल्याने पिंपल्स कमी होतात असं वाटतं का? मग हे वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:18 PM2020-01-14T12:18:26+5:302020-01-14T12:34:15+5:30

महिलांच्या चेहऱ्यावर अनेकदा पिंपल्स येत असतात.

know the disadvantages of popping a pimple. | दाबल्याने पिंपल्स कमी होतात असं वाटतं का? मग हे वाचाच

दाबल्याने पिंपल्स कमी होतात असं वाटतं का? मग हे वाचाच

Next

महिलांच्या चेहऱ्यावर अनेकदा पिंपल्स येत असतात. कधी मासिक पाळीमुळे कधी वातावरणात झालेल्या बदलामुळे तर कधी झोप पुर्ण न झाल्यामुळे  चेहऱ्यावर मुरून आणि पुळ्या येण्याचे प्रमाण वाढत असते. अनेकदा खाण्यापिण्याच्या अनियमीत वेळा असल्यामुळे पोट साफ होत नाही.  मग त्वचेद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर पडत असतात त्यावेळी पिंपल्स येतात.  चेहरा खराब दिसू लागतो. काहीवेळा तुम्ही  मेकअप  करण्यसाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करता. त्यात असलेल्या केमिकल्समुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते.

Image result for pimples

अनेकदा आपल्याला जेव्हा पार्टी किंवा फेस्टिवलला बाहेर जायचं असतं किंवा  आपली एखादी महत्वाची मिटिंग असते. त्यावेळीच नेमकं चेहऱ्यावर पिंपल्स आलेले असतात. असं झाल्याल आपल्याला ते पिंपल्स नको वाटतात. म्हणून आपण ते फोडून टाकतो. कारण आपल्याला चेहरा संपूर्ण प्लेन हवा असतो. पण तुम्हाला माहीत आहे का की जर तुम्ही  पिंपल्स फोडतं असाल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. 

Image result for skin pimples

पिंपल्स फोडल्याचे डाग तसेच राहतात

Image result for skin pimples

जर तुम्ही पिंपल्स फोडत असाल तर चेहरऱ्यावर काळे डाग पडतात. हे डाग निघण्यासाठी फार वेळ लागत असतो. कारण त्वचेच्या खालच्या भागांपर्यंत पिंपल्सचा डाग परिणाम करत असतो. काही महिन्यांनंतर ते डाग निघून जातात. हि परिस्थिती टाळण्यासाठी तुम्हाला जर पिंपल्स आले तर शक्यतो त्या भागाला हात लावू नका. पिंपल्स आल्यानंतर ते स्वतःहून जाईपर्यंत वाट बघा.

इन्फेक्शन होण्याचा धोका 

Image result for skin pimples

पुळ्या दाबल्यामुळे काहीवेळा त्याठिकाणातून स्त्राव होत असतो. अश्यात इतर ठिकाणी लागल्यास इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. तसंच जखम सुद्धा होऊ शकते. पुळ्या फोडल्यानंतर  त्या भागाला खाज किंवा सूज येण्याची शक्यता असते. 

खपली येणे

Image result for skin pimples

पिंपल्स फोडल्यानंतर अनेकदा त्वचेवर खपली येते. त्यामुळे तुमचा चेहरा जास्त खराब दिसतो. हे लपवण्यासाठी  कंसिलरचा वापर केला जातो.  पुळ्या  जास्त येण्याची  संभावना असते. जर एखाद्यावेळी फोडी फोडल्यानंतर तुम्हला  इन्फेक्शन झाले असेल तर वेळ न घालवता लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार  करा. अन्यथा तुम्हाचा संपूर्ण चेहरा सुद्धा पिंपल्सने भरू शकतो. (हे पण वाचा-हिवाळ्यात सुंदर त्वचा मिळवण्यासाठी 'हे' फेसपॅक नक्की ठरतील फायदेशीर )

Web Title: know the disadvantages of popping a pimple.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.