चमकदार आणि दाट केसांसाठी तुपाचा 'असा' वापर कराल तर ब्युटी प्रॉडक्ट्सना विसरून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 01:02 PM2020-01-16T13:02:02+5:302020-01-16T13:11:39+5:30

कोणताही ऋतू असो केस गळण्याच्या आणि केसात कोंडा होण्याच्या समस्या महिलांना उद्भवत असतात.

How to use ghee for long and shiny hairs | चमकदार आणि दाट केसांसाठी तुपाचा 'असा' वापर कराल तर ब्युटी प्रॉडक्ट्सना विसरून जाल

चमकदार आणि दाट केसांसाठी तुपाचा 'असा' वापर कराल तर ब्युटी प्रॉडक्ट्सना विसरून जाल

Next

कोणताही ऋतू असो केस गळण्याच्या आणि केसात कोंडा होण्याच्या समस्या महिलांना उद्भवत असतात. बदलत्या वातावरणात पोषक घटकांची कमतरता भासत असल्यामळे  केस मोठ्या प्रमाणात गळत असतात. सगळ्यात स्त्रियांना केस गळण्याची समस्या उद्भवत असते पण कारणं वेगवेगळी असतात.  आज आम्ही तुम्हाला घरगुती वापरात असलेल्या तुपाचा वापर करून कशाप्रकारे केस चमकदार बनवू शकता हे सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया तुपाच्या वापराने कशी घ्यायची केसांची काळजी. 

आत्तापर्यंत तुम्हाला तुपाचे सेवन करण्याचे आणि तुपाचा आहारात समावेश करण्याचे अनेक फायदे माहीत असतील.  तज्ञांच्यामते आहारात रोज एक चमचा तूप असणं गरजेचं आहे. केसांवर सुद्धा  तुपाचा वापर केल्यास लाभदायक ठरत असतं.तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात.(हे पण वाचा-सतत डोकेदुखीची समस्या होते? तुमची 'ही' हेअरस्टाईल आहे कारण.... )

केसांच्या मजबूती साठी 

Image result for ghee

जर तुमचे केस कमजोर होत असतील आणि गळत असतील तर आपल्या केसांना तुपाने मसाज करा. यासाठी रात्री झोपण्याआधी  तुप गॅसवर ठेवून हलकं गरम करा.  केसांच्या मुळांना मसाज करा. असे केल्यास केसांच्या मुळांना फायदा पोहोचतो. यामुळे केस गळण्याची समस्या  दूर होते. ( हे पण वाचा-जुनी स्टाईल म्हणून तुम्ही वेणी घालत नसाल तर 'हे' वाचाच, आईकडे वेणी घालण्यासाठी रोज कराल हट्ट)

केस पांढरे होण्यापासून वाचवतं 

Image result for ghee

जर  तुमचे केस कमी वयातच पांढरे व्हायला सुरूवात झाली असेल तर तुम्हाला  वेगळं काही करण्याची गरज नाही. तुप कोमट गरम करून  केसांची मसाज करा आणि टॉवेल केसांना गुंडाळून ठेवा.   १५ ते २० मिनिटं केस असेच राहू द्या. नंतर केसांना शॅम्पूचा वापर करून धुवा हा प्रयोग सलग ४ आठवडे केल्यानंतर फरक दिसून येईल.

केसांना चमकदार करण्यासाठी 

Image result for ghee for hair(image credit-www.lifealth.com)

जर तुमचे केस गळत असतील आणि कोरडे पडले असतील तर तुपाचा वापर राईच्या तेलासोबत करून तुम्ही या समस्ये पासून सुटका मिळवू शकता.  यासाठी २ चमचे तुपात २ चमचे राईचं तेल मिसळून आंघोळीच्या आधी केसांना मसाज करा.  काहीवेळानंतर केस धुवून टाका. हा प्रयोग दोन आठवडे  केल्यास फरक दिसून येईल. 

Web Title: How to use ghee for long and shiny hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.