जुनी स्टाईल म्हणून तुम्ही वेणी घालत नसाल तर 'हे' वाचाच, आईकडे वेणी घालण्यासाठी रोज कराल हट्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 12:50 PM2020-01-15T12:50:49+5:302020-01-15T13:07:09+5:30

आजकाल लहानांपासून मोठ्या सगळ्याच मुली वेगवेगळे प्रयोग केसांवर करत  असतात.

Know the benefits of braid hairstyle | जुनी स्टाईल म्हणून तुम्ही वेणी घालत नसाल तर 'हे' वाचाच, आईकडे वेणी घालण्यासाठी रोज कराल हट्ट

जुनी स्टाईल म्हणून तुम्ही वेणी घालत नसाल तर 'हे' वाचाच, आईकडे वेणी घालण्यासाठी रोज कराल हट्ट

googlenewsNext

आजकाल लहानांपासून मोठ्या सगळ्याच मुली वेगवेगळे प्रयोग केसांवर करत असतात. साधारणपणे शालेय जीवनात असेपर्यंत सगळ्याच मुलींचे केस व्यवस्थित आणि दाट असतात.  कारण शाळेत असताना मुली केसांना तेल लावून केसांची निगा राखत असतात. पण त्यानंतर मात्र केसं मोकळे राहील्याने किंवा केसांना पोषण न मिळाल्यामुळे केस गळण्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या उद्भवतात.

Image result for braid

सध्याच्या परिस्थितीत अनेक दिवस मुली आपल्या केसांना तेल लावत नाहीत. कंगवा केसात घातल्यानंतर लगेच  केस गळायला सुरूवात होते. पण तुम्हाला माहीत आहे का अलिकडे  केसांना स्मुथनिंग, रिबॉन्डिंग करण्याच्या फॅशनमध्ये केसांची वेणी घालून घराबाहेर पडत असलेल्या मुली खूप कमी आहेत.  केसांची वेणी घातल्यानंतर जे फायदे होतात. ते वाचून तुम्ही अवाक् व्हाल. चला तर मग जाणून घेऊया वेणी घातल्याने केसांना काय फायदे होतात. (हे पण वाचा-केसगळती थांबवण्यासाठी सर्वात खास नैसर्गिक उपाय, 'असा' तयार करा पालकाचा हेअर पॅक!)

Image result for braid
केस तुटण्यापासून बचाव

Image result for braid

केसांना बांधून ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं असतं.  केसांची वेणी घातल्यामुळे केस मजबूत राहतात. केसांच्या वाढीसाठी वेणी घालणं फार महत्वाचं असतं.  केसांची वेणी घालण्यासाठी केसांना आधी तेल लावणं फायदेशीर ठरेल. अनेकदा तुम्ही झोपलेल्या अवस्थेत असताना केस गुंता होतात. अशावेळी जर तुम्ही केसांची वेणी घालून झोपाल तर केस गुंता होणार नाहीत. झोपण्यापूर्वी वेणी घातल्यास फायदेशीर ठरतं. (हे पण वाचा-रेजरचा वापर त्वचेसाठी पडू शकतो महागात, अशी घ्या काळजी)

Image result for braid

झोपण्यापूर्वी जर तुम्ही केसांची वेणी घातली तर डोक्याच्या नसांना आराम मिळतो. तसंच केसांमध्ये  ताण निर्माण होत नाही. अर्थात वेणी घालताना  जास्त घट्ट असू नये.  नाहीतर डोक्यावर  ताण येऊन डोकं दुखू शकतं. तसंच केसांची जर चांगली वाढ तुम्हाला हवी असेल तर रोज रात्री नारळाचं किंवा बदामाचं तेल लावून वेणी घातल्यास फरक दिसून येईल. 

Image result for braid
केस मऊ होतात

जर तुमचे केस रुक्ष आणि कोरडे झाले असतील तर वेणी घातल्यामुळे केसांना मऊपणा येतो. जर तुम्ही जास्त घट्टवेणी घालत असाल तर खाज येण्याची आणि केस कोरडे पडण्याची शक्यता असते. केसांच्या विकासासाठी आणि वाढीसाठी वेणी घालणं फायद्याचं ठरतं. 

Web Title: Know the benefits of braid hairstyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.