शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

Beauty Tips : रुबाबदार दाढीसाठी सेलिब्रिटीदेखील करतात हे उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 19:38 IST

आपणासही सेलिब्रिटीसारखी रुबाबदार दाढी हवीय, वापरा या टिप्स !

-Ravindra Moreपुरुषांच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी दाढीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अगोदर बरेचजण तुळतूळीत दाढी ठेवायचे, त्यात आपण सुंदर दिसतो असे कित्येकांना वाटायचे. आता मात्र ट्रेंड बदलला आहे. रुबाबदार दिसण्यासाठी दाढीदेखील रुबाबदार पाहिजे असे बरेचजणांना वाटू लागले. त्यामुळेच पिळादर मिशांसोबत दाढी वाढवण्याची फॅशन आली आहे. विशेष म्हणजे दाढीमुळे तुमचे वय लपवायलाही मदत होते. शिवाय सनबर्न आणि चेहऱ्याच्या समस्या कमी होण्यासाठी मदत होते. मात्र बऱ्याचजांच्या वयासोबत दाढी वाढत नाही आणि अशा पुरुषांची इतरांसमोर कुचंबना होताना दिसते. पण आम्ही काही खास टिप्स देत आहोत ज्याद्वारे आपली दाढी रुबाबदार होऊ शकते. विशेष म्हणजे बरेच सेलिब्रिटी आपली दाढी रुबाबदार बनविण्यासाठी खालील टिप्स वापरतात.  * आवळा तेल ज्यांना फुल दाढी येत नाही अशांनी आवळा तेलाचा वापर केल्यास फायदा नक्की होईल. कारण आवळा तेल चेहऱ्यावर केस उगण्यासाठी सर्वात परिणामकारक औषध आहे. यासाठी फक्त आवळ्याचे तेल किंवा मोहरीच्या तेलात मिसळवून लावू शकता. हे तेल लावल्यानंतर २० मिनिटांनी सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. याशिवाय मोहरीची पाने धुवून त्याची वाटून पेस्ट करून त्यामध्ये आवळ्याचे तेल घाला. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि २० मिनिटानंतर धुवून टाका. आठवड्यात ४ वेळा केल्यास त्याचा परिणाम तुम्हाला जाणवेल.  * खोबऱ्याचे तेल खोबऱ्याच्या तेलातील गुणधर्मामुळे केसांची वाढ होण्यास खूप मदत होते. यासाठी खोबऱ्याचे तेल निलगिरीच्या तेलात १०:१ या प्रमाणात घ्या.कापसाच्या बोळ्याने या तेलाच्या मिश्रणाला चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिटानंतर पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचेसंबंधीत समस्या कमी होतात आणि दाढीच्या वाढीस मदत होते.  * निलगिरीचे तेल निलगिरीचे तेलही दाढीचे केस वाढण्यास मदत होते मात्र निलगिरीचे तेल चेहऱ्याला लावताना काळजी घ्या. यासाठी आॅलिव्ह तेलामध्ये १५ ते ३० थेंब निलगिरीचे तेल टाका. या मिश्रणाने चेहऱ्याला मसाज करा आणि ३० मिनिटानंतर पाण्याने धुवून टाका.  Also Read : ​Beauty : ​फुल दाढी येण्यासाठी लिंबूचा असा करा वापर !                    Beauty : ​दाढी करण्यापूर्वी कोरफड लावल्यास होणारे फायदे जाणून व्हाल थक्क !