शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

​हाता-पायांचेही सौंदर्य खुलवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 18:11 IST

आपले व्यक्तिमत्त्व हे आपल्या सौंदर्यावर अवलंबून असते. यासाठी आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी सर्वचजण अगदी मनापासून प्रयत्नही करतात.

आपले व्यक्तिमत्त्व हे आपल्या सौंदर्यावर अवलंबून असते. यासाठी आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी सर्वचजण अगदी मनापासून प्रयत्नही करतात. विशेषत: सुंदर दिसण्यासाठी आपण जास्त काळजी चेहऱ्याचीच घेत असतो आणि हाता-पायांच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करीत असतो. सुंदर दिसण्यासाठी फक्त चेहराच महत्त्वाचा नसून, इतर गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकवेळी पार्लरमध्ये जाण्याची काहीच गरज नाही. या काही घरगुती टिप्सनी तुमचे हात-पाय नक्कीच सुंदर दिसतील....बऱ्याचदा आपल्या हाता-पायांच्या कोपºयांना काळेपणा आलेला असतो. त्यामुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते. यासाठी लिंबाचा रस कोपर व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात आणि काळेपणा नाहीसा होतो. काळवंडलेल्या हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचे पीठ दुधात मिक्स करा. ही पेस्ट हातांना लावून मसाज करा. पपईचा गर चोळल्यानेही काळेपणा कमी होऊ शकतो. थंडीच्या दिवसात हाता-पायांना लवंगतेल, बदामतेल, कोल्डक्रीमने मसाज केल्यास त्यांचा मऊपणा टिकून राहतो.आठवड्यातून किमान दोनदा सौम्य शाम्पू गरम पाण्यात टाकून त्यात १० मिनिटे पाय ठेवावेत. नंतर पाय स्वच्छ पुसून साय व हळदीने तळव्याला मसाज करावा. यामुळे भेगांचे प्रमाण कमी होऊन पायांचे सौंदर्यही वाढते. पायाना भेगा असल्यास ग्लिसरीन व लिंबूरसाचे मिश्रण रात्री लावल्यानेही चांगला फायदा होतो. नखांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ती तुटतात. ती मजबूत व्हावीत याकरता ग्लिसरिन, मध, लवंगतेल यांच्या मिश्रणात नखे भिजवावीत. नखांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना कॅल्शिअमची आवश्यकता असते. त्यासाठी कॅल्शिअमयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. तसेच लिंबू चोळण्याने नखांना चमक येते.