Yamaha YZF-R15 launched in new red; Know the price, Bajaj Pulsar RS200 will give a bump | Yamaha YZF-R15 नव्या लाल रंगात लाँच; जाणून घ्या किंमत, Bajaj Pulsar RS200 ला देणार टक्कर

Yamaha YZF-R15 नव्या लाल रंगात लाँच; जाणून घ्या किंमत, Bajaj Pulsar RS200 ला देणार टक्कर

Yamaha Motor India (यामाहा मोटर इंडिया) ने गुरुवारी फुल-फेयर्ड मोटरसायकल YZF R15 V3.0 च्या नवीन लाल मेटालिक कलरमय़ध्ये लाँच केली आहे. R15 V3.0 तिच्या सेंगमेंटमध्ये सर्वात जबरदस्त स्पोर्टी मोटरसायकपैकी एक आहे. आता या बाईकची तिसरी पीढी विकली जात आहे. (YZF-R15 Version 3.0 all set to adorn the Indian roads in Metallic Red colour)


YZF-R15 व्हर्जन 3.0 मध्ये पहिल्यासारखेच 155 सीसी, लिक्विड कूल्ड, 4 स्ट्रोक, एसओएससी, 4 व्हॉल्व, फ्युअल इंजेक्टेड इंजिन मिळणार आहे. या इंजिनामध्ये कंपीनीने व्हेरिएबल व्ह़ल्व एक्टिव्हेशन (VVA)  तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. याशिवाय, यामध्ये असिस्ट आणि स्लिपर क्लच आणि एक साईड स्टँड इंजिन कट-ऑफ स्वीच देण्यात आला आहे. आता यामहाच्या सर्व मॉडेलमध्ये हा स्वीच देण्यात येऊ लागला आहे. 

लुनाच जणू! केवळ 20 पैशांमध्ये 1 किमी धावणार; दिल्ली आयआयटीच्या पोरांना लय भारी 'Hope'


नवीन मेटॅलिक रेड कलरमध्ये ही बाईक लाँच झालेली असली तरीही ती आणखी काही रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये रेसिंग ब्लू, थंडर ग्रे आणि डार्कनाइटचा पर्याय आहे. आता ही बाईक चार रंगात उपलब्ध झाली आहे. 


किंमत...
नव्या मॉडेलची एक्स शोरुम किंमत 1,52,100 रुपये आहे. नवीन पेंट स्कीमशिवाय मोटरसायकलमध्ये कोणताही अन्य बदल करण्यात आलेला नाही. Yamaha YZF-R15 Version 3.0 ही Bajaj Pulsar RS200 (बजाज पल्सर आरएस200), Suzuki Gixxer SF (सुजुकी गिक्सर एसएफ) सारख्या बाईकना टक्कर देणार आहे. 

यस Yamaha! नवी रेट्रो XSR 250 मोटरसायकल लाँच करण्याच्या तयारीत; फोटो पहा...

Yamaha Motor लवकरच भारतात रेट्रो क्लासिक मोटरसायकल XSR 250 लाँच करण्य़ाची शक्यता आहे. ही मोटरसायकल केवळ ताकदवान नाही तर याचे डिझाईनही ग्राहकांच्या आवडी पाहून बनविण्य़ात आले आहे. येत्या उत्सवी सिझनपर्यंत ही बाईक बाजारात येण्याची शक्यता आहे. (Yamaha XSR 250 could be underpinned by the same platform as the FZ25 and is expected to use the 249 cc engine air/oil cooled engine)

Web Title: Yamaha YZF-R15 launched in new red; Know the price, Bajaj Pulsar RS200 will give a bump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.