शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःचे EV चार्जिंग स्टेशन सुरू करा, महिन्याला होईल लाखोंची कमाई; अर्ज कुठे करावा लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 18:20 IST

EV Charging Station: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

EV Charging Station: भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर झपाट्याने वाढत असून, त्यासोबतच EV चार्जिंग स्टेशन व्यवसायालाही मोठी मागणी निर्माण झाली आहे. रिकामी जमीन असलेल्या आणि स्थिर उत्पन्नाचा व्यवसाय शोधणाऱ्या नागरिकांसाठी हा एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो. एकदा सेटअप केल्यानंतर या व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळण्याची संधी आहे.

चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी आवश्यक अटी

EV चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी किमान ५० ते १०० चौरस मीटर मोकळी जागा आवश्यक असते. ही जमीन स्वतःच्या नावावर किंवा किमान १० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर असणे गरजेचे आहे. तसेच २४ तास वीजपुरवठा अनिवार्य असून वन विभाग, अग्निशमन दल आणि महापालिकेकडून आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतात. याशिवाय वाहनांच्या पार्किंगची सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालय, विश्रांती व्यवस्था आणि अग्निसुरक्षा सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

या व्यवसायासाठी अर्ज करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला म्हणजे राष्ट्रीय महामार्ग किंवा परिवहन विभागामार्फत थेट अर्ज करणे. दुसरा पर्याय म्हणजे खासगी कंपन्यांच्या फ्रँचायझीद्वारे व्यवसाय सुरू करणे. या पद्धतीत तांत्रिक सहाय्य आणि सेटअपसाठी मार्गदर्शन मिळते, त्यामुळे नवशिक्यांसाठी हा पर्याय सोपा मानला जातो.

EV चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी सुमारे १५ ते २० लाख रुपयांची गुंतवणूक लागते, जी स्टेशनच्या क्षमतेनुसार बदलू शकते. या व्यवसायातील उत्पन्न हे वाहनांच्या चार्जिंगवर अवलंबून असते. अधिक वाहनांची ये-जा असेल तर उत्पन्न वाढते. मध्यम क्षमतेच्या स्टेशनमधून दररोज चांगली कमाई होऊन महिन्याला लाखो रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

मात्र, या व्यवसायात कर्मचारी वेतन, देखभाल आणि वीज खर्च यांसारखे नियमित खर्चही लक्षात घेणे आवश्यक आहे. योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास EV चार्जिंग स्टेशन हा दीर्घकालीन स्थिर उत्पन्न देणारा व्यवसाय ठरू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Start an EV Charging Station, Earn Lakhs Monthly: How to Apply

Web Summary : EV charging stations offer lucrative opportunities amid rising electric vehicle adoption. Requires land, permits, and investment. Apply via transport departments or private franchises. Potential monthly income can reach lakhs, balancing operational costs for long-term gains.
टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर