शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
5
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
6
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
7
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
8
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
9
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
10
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
11
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
12
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
13
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
14
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
15
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
16
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
18
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
19
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
20
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:52 IST

Skoda Auto India : 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये विक्री दुप्पट झाली.

Skoda Auto India ने 2025 मध्ये भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इतिहास रचला आहे. कंपनीने आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक विक्री नोंदवत मोठी कामगिरी केली आहे. 2024 मध्ये स्कोडाची विक्री सुमारे 35 हजार युनिट्सपर्यंत मर्यादित होती, तर 2025 मध्ये हा आकडा थेट 72 हजारांहून अधिक झाला आहे. अवघ्या एका वर्षात विक्री दुपटीहून अधिक वाढणे ही स्कोडासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.

विशेष म्हणजे, स्कोडा ऑटो इंडियाच्या भारतातील 25 वर्षांच्या प्रवासाच्या टप्प्यावरच ही ऐतिहासिक कामगिरी साध्य झाल्यामुळे हा यशाचा क्षण कंपनीसाठी अधिकच खास ठरतो.

Skoda Kylaq ची सर्वाधिक विक्री

स्कोडाच्या या जबरदस्त यशामागे सर्वात मोठा वाटा आहे कंपनीची नवी कॉम्पॅक्ट SUV Skoda Kylaq चा आहे. लॉन्च होताच कायलॅकने भारतीय ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आणि अल्पावधीतच ही स्कोडाची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी सुमारे 43 हजार  Kylaq विक्री झाल्या आहेत. कमी किंमत, प्रीमियम लूक, मजबूत बांधणी आणि हाय सेफ्टी स्टँडर्ड्समुळे Kylaq विशेषतः त्या ग्राहकांसाठी आकर्षण ठरली, जे सुरक्षित आणि दमदार SUV च्या शोधात होते.

इंजिन आणि परफॉर्मन्स

Skoda Kylaq ही SUV खास भारतीय बाजार लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. यात 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते चांगली पॉवर आणि इंधन कार्यक्षमता (मायलेज) यांचा संतुलित अनुभव देते. स्कोडाची ओळख असलेली मजबूत बॉडी, उत्कृष्ट बिल्ड क्वालिटी आणि सेफ्टी फीचर्सही या कारमध्ये ठळकपणे दिसून येतात.

फीचर्स आणि सेफ्टी

  • यात 5-स्टार भारत NCAP सेफ्टी रेटिंग
  • 6 एअरबॅग्स
  • LED हेडलॅम्प्स
  • 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
  • 8-इंच डिजिटल (व्हर्चुअल) कॉकपिट
  • 17-इंच अलॉय व्हील्स
  • सनरूफ, वायरलेस चार्जर
  • 446 लिटर बूट स्पेस
  • रिअर AC व्हेंट्स, कूल्ड ग्लोव्हबॉक्स
  • एम्बिएंट लाइटिंग

अशी अनेक आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी भारतीय रस्ते आणि ग्राहकांच्या गरजांसाठी उपयुक्त ठरतात. Skoda Kylaq ची किंमत ₹7.55 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होऊन, टॉप व्हेरियंटसाठी ₹12.80 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Skoda Breaks 25-Year Record: Car Transforms Company's Fortune!

Web Summary : Skoda Auto India achieved record sales in 2025, exceeding 72,000 units, doubling from 2024. The success is attributed to the Skoda Kylaq SUV, which accounted for approximately 43,000 sales due to its affordability, safety, and features.
टॅग्स :Skodaस्कोडाcarकारAutomobileवाहन