नाही, नको करता करता टोयोटा पहिली ईव्ही कार लाँच करणार; किंमत, रेंज किती असणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 10:20 IST2026-01-20T10:19:43+5:302026-01-20T10:20:46+5:30
Toyota Urban Cruiser EV Details: टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक SUV 'Urban Cruiser EV' आज सादर होत आहे. ५०० किमी रेंज, ADAS आणि २० लाखांपासून सुरू होणारी किंमत. वाचा सविस्तर रिव्ह्यू.

नाही, नको करता करता टोयोटा पहिली ईव्ही कार लाँच करणार; किंमत, रेंज किती असणार...
मुंबई: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात टोयोटा किर्लोस्कर मोटर आपले पहिले पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहन सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. बहुप्रतिक्षित 'टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही' चे अनावरण आज, २० जानेवारी २०२६ रोजी केले जाणार आहे. मारुती सुझुकीच्या 'e Vitara' वर आधारित असलेली ही SUV भारतीय बाजारपेठेत ईव्ही क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहे.
टोयोटाचा ईलेक्ट्रीक वाहनांना विरोध होता. यामुळे जगभरातील कंपन्या ईलेक्ट्रीक गाड्यांकडे वळत असताना टोयोटाने हायब्रिड कारचा दट्टा चालविला होता. तसेच हायड्रोजन कारवर संशोधन सुरु ठेवले होते. टोयोटा ईलेक्ट्रीक कार आणणार नाही असेही कंपनीने जाहीरही केले होते. परंंतू, आज टोयोटा ईलेक्ट्रीक कार भारतीय बाजारात आणणार आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्स:
बॅटरी ऑप्शन्स: ही कार ४८.८ kWh आणि ६१.१ kWh अशा दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे.
दमदार रेंज: कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक SUV एका पूर्ण चार्जवर ५०० ते ५५० किमी पर्यंतची रेंज देईल.
डिझाइन: टोयोटाची ही ईव्ही मारुती e Vitara सारखी असली तरी, तिचे बाह्य रूप (Fascia), LED DRLs आणि हेडलाइट्स टोयोटाच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये असतील.
आधुनिक फीचर्स: कारच्या आत १०.२५-इंच इंफोटेनमेंट स्क्रीन, १०.१-इंच डिजिटल क्लस्टर, लेव्हल २ ADAS (सुरक्षा यंत्रणा), ३६०-डिग्री कॅमेरा आणि सनरूफ यांसारखी हाय-टेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.
किंमत आणि स्पर्धा:
टोयोटा अर्बन क्रूझर ईव्हीची अंदाजित किंमत २० लाख ते २५ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे. बाजारात आल्यानंतर या कारची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक, टाटा कर्व ईव्ही आणि एमजी विंडसर ईव्ही यांसारख्या दिग्गज गाड्यांशी होईल.