मुंबई: कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सध्या कमालीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. मात्र, या स्पर्धेत निसानने आपली 'मॅग्नाईट' नव्या अवतारात उतरवली आहे. नव्या पिढीची निसान मॅग्नाईट नक्की कशी आहे? तिचे मायलेज, सुरक्षा आणि मुख्य म्हणजे घाटक्षेत्रातील तिची कामगिरी कशी आहे? याचा सविस्तर आढावा आम्ही यापूर्वी घेतला आहेत. शिवाय यावेळी आम्ही ही कार पुण्यासारख्या शहरात जवळपास १२० किमी चालवून पाहिली आहे. या काळात कारचा पिकअप, मायलेज कसे होते याचा अनुभव घेतला आहे.
दरडींचा धोकादायक अणुस्कुरा घाट अन् Nissan Magnite AMT; 1200 किमींची कोकणात भ्रमंती, कशी वाटली...
कोकणातील रस्ते आणि विशेषतः धोकादायक समजला जाणारा 'अनुस्कुरा घाट' म्हणजे कोणत्याही गाडीसाठी मोठी परीक्षा असते. निसान मॅग्नाईटच्या AMT (Easy-Shift) मॉडेलने या घाटात आपली ताकद सिद्ध केली आहे. चढणीवर गाडी मागे न सरकणे (Hill Start Assist) आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे ड्रायव्हरचा थकवा कमी होणे, या गोष्टी मॅग्नाईटच्या बाबतीत प्लस पॉईंट ठरल्या होत्या. आता पुण्यात वाहतूक कोंडीत या कारने कसा परफॉर्म केला, ते पाहुया.
शहरात चालविण्यासाठी खास सीव्हीटी कार वापरून पाहिली. इथेनॉल मिक्स पेट्रोल, वाहतूक कोंडी यामुळे गाडीचे मायलेज आम्हाला पहायचे होते. कारने कुठेही बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये कच खाल्ली नाही. पिकअप इतर प्रसिद्ध कंपन्यांच्या कारपेक्षा खूप चांगला होता. स्पीडब्रेकर असेल किंवा सिग्नल गाडी ताकदीने उठत होती. तरीही कारने बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये ८-९ किमी प्रति लीटर, मुव्हिंग ट्रॅफिकमध्ये १२ आणि ४०-५० किमी वेगाने चालविता येणाऱ्या रस्त्यांवर १४ किमी प्रति किमी एवढे मायलेज दिले. इथेनॉलचा साईड इफेक्ट आम्हाला कुठेही दिसला नाही. कारण या सीव्हीटी कारने आम्हाला काही महिन्यांपूर्वी देखील एवढेच मायलेज दिले होते. याची लिंक आम्ही खाली देत आहोत.
शहरात चालविण्यासाठी ना खूप मोठी ना खूप छोटी अशी ही कार आम्हाला वाटली. पिकअप चांगला असल्याने तुम्हाला थांबलेली गाडी उठविण्याचे कष्ट करावे लागणार नाहीत. मायलेजही शहरात जेवढे इतर कारना मिळते तेवढेच आहे. त्यामुळे खिशालाही कुठे फटका बसणार नाही. सस्पेंशन चांगले वाटले, कुठेही खड्ड्यात गाडी आदळली आणि त्याचा दणका आत बसलेल्यांना जाणवला नाही. हिवाळा असल्याने एसीची गरज भासली नाही. परंतू आम्ही या कारचा उन्हाळ्यात एसी बऱ्यापैकी वापरून पाहिलेला आहे. कुठेही तो मान टाकत नाही.
नव्या पिढीची निस्सान मॅग्नाईट, कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमधील 'हल्क', हलक्यात घेण्यासारखी नसलेली....
कारची बुटस्पेस बऱ्यापैकी मोठी आहे. यामुळे तुम्हाला शहरात वापरासाठी आणि विकेंडला फिरायला जाण्यासाठी देखील पुरेसे सामान नेता येणार आहे. साऊंड सिस्टीमचा आवाज चांगला आहे, तुम्ही बराच वेळ संगीत ऐकू शकता, कानांना त्रास जाणवत नाही. तुम्हाला अँड्रॉईड आणि अॅपल कारप्ले देण्यात आलेला आहे. तसेच वायरलेस चार्जिंगची सोयही देण्यात आलेली आहे. यामुळे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत या बजेट रेंजमध्ये कार कुठेच मागे नाही. तुम्हाला रिव्हर्स कार पार्किंग कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे. शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे या कारला फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगही मिळालेली आहे. यामुळे कुटुंबासाठी ही या सेगमेंटमधील एक सुरक्षित कार आहे.
Web Summary : The Nissan Magnite AMT excels in city traffic, offering good pickup and decent mileage (9-14 kmpl). Its suspension handles bumps well. It's spacious, safe with a 5-star rating, and feature-rich, making it suitable for city commutes and weekend trips.
Web Summary : निसान मैग्नाइट एएमटी शहर के ट्रैफिक में उत्कृष्ट है, जो अच्छा पिकअप और उचित माइलेज (9-14 किमी प्रति लीटर) प्रदान करता है। इसका सस्पेंशन धक्कों को अच्छी तरह से संभालता है। यह 5-स्टार रेटिंग के साथ विशाल, सुरक्षित और सुविधा संपन्न है, जो इसे शहर की यात्रा और सप्ताहांत यात्राओं के लिए उपयुक्त बनाता है।