देशातील सर्वात हायटेक ईलेक्ट्रीक कार पेटली; हायवेवर वेगात असताना धूर येऊ लागला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 19:15 IST2026-01-25T19:14:57+5:302026-01-25T19:15:31+5:30

Mahindra XEV 9e EV Fire: हापूर टोल नाक्याजवळ महिंद्रा इलेक्ट्रिक कारला भीषण आग; व्हिडिओ व्हायरल.

Mahindra XEV 9e EV Fire video: The country's most high-tech electric car caught fire; smoke started coming out while speeding on the highway and... | देशातील सर्वात हायटेक ईलेक्ट्रीक कार पेटली; हायवेवर वेगात असताना धूर येऊ लागला अन्...

देशातील सर्वात हायटेक ईलेक्ट्रीक कार पेटली; हायवेवर वेगात असताना धूर येऊ लागला अन्...

हापूर : उत्तर प्रदेशातील हापूर टोल नाक्याजवळ एका धावत्या महिंद्राइलेक्ट्रिक कारला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही वेळातच संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने, कारमधील प्रवासी वेळेत बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

ही इलेक्ट्रिक कार हायवेवरून जात होती, टोल नाक्यापासून काही अंतरावर असताना कारमधून धूर निघू लागला. प्रसंगावधान राखून चालकाने कार बाजूला उभी केली. अवघ्या काही सेकंदातच बॅटरीच्या ठिकाणाहून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यामध्ये आग विझवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरताना दिसत आहेत.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बॅटरीमधील 'थर्मल रनअवे' किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत कारचा सांगाडाच शिल्लक राहिला होता. महिंद्रा कंपनीकडून या तांत्रिक बिघाडाबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण येणे बाकी आहे.

Web Title : हाईवे पर हाईटेक इलेक्ट्रिक कार में लगी आग; बड़ा हादसा टला

Web Summary : उत्तर प्रदेश में एक टोल प्लाजा के पास महिंद्रा की इलेक्ट्रिक कार में आग लग गई। धुंआ देखकर ड्राइवर ने गाड़ी रोकी और यात्री सुरक्षित बाहर निकल गए। बैटरी में खराबी के कारण आग लगने की आशंका है, जिससे इलेक्ट्रिक वाहनों की सुरक्षा पर सवाल उठ रहे हैं।

Web Title : High-Tech Electric Car Catches Fire on Highway; Major Incident Averted

Web Summary : A Mahindra electric car caught fire near a toll plaza in Uttar Pradesh. The driver noticed smoke and pulled over just before the car was engulfed in flames. Passengers escaped unharmed. The cause is suspected to be a battery malfunction, raising safety concerns about electric vehicles.