शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:37 IST

Ola electric Spare Part: ओला ईलेक्ट्रीक कंपनी सर्व्हिसच्या वादानंतर आपल्या ग्राहकांसाठी नवीन पर्याय घेऊन आली आहे. सर्व्हिस मिळत नसल्याने, स्पेअर पार्ट उपलब्ध नसल्याने हजारो गाड्या आजही धूळ खात पडून आहेत.

भारतातील ईलेक्ट्रीक दुचाकींच्या क्षेत्रात आघाडीवर असलेली आणि आता पिछाडीवर पडत चाललेली ओला ईलेक्ट्रीक कंपनी सर्व्हिसच्या वादानंतर आपल्या ग्राहकांसाठी नवीन पर्याय घेऊन आली आहे. सर्व्हिस मिळत नसल्याने, स्पेअर पार्ट उपलब्ध नसल्याने हजारो गाड्या आजही धूळ खात पडून आहेत. अशातच कंपनीने आपल्या ग्राहकांना ओलाच्या अॅपवरच स्पेअर पार्ट उपलब्ध करून दिले आहेत. एवढेच नाही तर प्रशिक्षित मेकॅनिककडून ते बदलून घेण्याची आणि दुरुस्ती करण्याची मुभाही दिली आहे. 

आतापर्यंत केवळ ओलाच्या अधिकृत नेटवर्कसाठी उपलब्ध असलेले जेन्युइन स्पेअर पार्ट्स, डायग्नोस्टिक टूल्स आणि सर्व्हिस ट्रेनिंग मॉड्यूल्स देशभरातील स्वतंत्र गॅरेज, मेकॅनिक आणि फ्लीट ऑपरेटर्ससाठी खुले करण्यात आले आहेत. कंपनीचा मालक भाविष अग्रवालने याची माहिती त्याच्या एक्स अकाऊंटवर दिली आहे. कंपनीने यासाठी खास ॲप (App) आणि वेबसाईट लाँच केली आहे. याद्वारे ग्राहक आणि मेकॅनिक थेट ओलाचे प्रमाणित स्पेअर पार्ट्स खरेदी करू शकतील. यामुळे ईव्ही सर्व्हिसिंगच्या क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. ओलाने आतापर्यंत १० लाखांहून अधिक स्कूटर विकल्या आहेत. यापैकी बऱ्याच स्कूटर या सर्व्हिस नसल्याने कचऱ्यात धुळ खात पडल्या आहेत. ओलाच्या सर्व्हिस सेंटरवरच अशा कित्येक स्कूटर दिसतात. या नवीन हायपर सेवेमुळे ओलाचे ग्राहक आता कंपनीच्या सेवेवर अवलंबून राहणार नाहीत. सध्या ओलाच्या ग्राहकांच्या ॲपवर आणि कंपनीच्या वेबसाईटवर मुख्य स्पेअर पार्ट्स खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ओलाच्या स्कूटर कशा दुरुस्त करायच्या, त्यांतील समस्या आदी गोष्टी शिकण्यासाठी ओला डायग्नोस्टिक टूल्स आणि तंत्रज्ञ प्रमाणन कार्यक्रम देखील राबविणार आहे. यामुळे खुल्या बाजारात स्पेअर पार्ट मिळतील आणि दुरुस्ती देखील सोपी होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ola Electric Enables Owners to Buy Parts, Repair Themselves

Web Summary : Ola Electric now allows customers to buy spare parts directly via an app and website, enabling repairs by independent mechanics. This aims to address service issues, providing greater accessibility and reducing reliance on official service centers for Ola scooter owners.
टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर