शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनात किती पेट्रोल भरलं; आता मोबाइलवर येणार नोटिफिकेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 09:50 IST

पेट्रोल पंपावर मापात पाप करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी अनोखं तंत्रज्ञान विकसित केलं आहे.

नवी दिल्लीः पेट्रोल पंपावर मापात पाप करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी अनोखं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. पंपावर गाडीत पेट्रोल भरल्यानंतर एक नोटिफिकेशन येणार आहे. हे नोटिफिकेश मोबाइलच्या माध्यमातून मिळणार असून, आपण गाडीत किती पेट्रोल भरलं ते अचूकरीत्या सांगणार आहे. आयआयटी विद्यार्थ्यांनी प्राध्यापक नचिकेत तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे  फ्यूल क्वांटिफायर डिवाइस तयार केलं आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर होणारी चोरी रोखता येणार असून, मापात पापही करता येणं कठीण होणार आहे. फ्यूल क्वांटिफायर डिवाइस हे कोणत्याही कार, मोटारसायकल, स्कूटर आणि स्कूटीमध्ये लावू शकतो. विशेष म्हणजे हे डिवाइस लावल्यानंतर वाहनात कोणताही बदल करण्याची आवश्यकता नसते. पेट्रोल टँकमध्ये हे डिवाइस बसवण्यात येणार आहे. ज्याच्या माध्यमातून गाडीच्या टाकीत किती पेट्रोल टाकण्यात आलं हे समजणार आहे. त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाइलवर येणार आहे.वाहनचालक पेट्रोल पंपावर लावण्यात आलेलं मीटर आणि मोबाइलमध्ये असलेल्या डाटा पडताळूनही पाहू शकतो. हे डिवाइस ब्लू टुथच्या माध्यमातून कनेक्ट होणार आहे, त्यामुळे याचे नोटिफिकेश मोबाइलवर समजणार आहेत. माझ्या मार्गदर्शनात पीएचडी, एमटेकच्या विद्यार्थ्यांनी हे डिवाइस विकसित केलं आहे. हे डिवाइस बनवण्यासाठी जवळपास आठ महिन्यांचा वेळ लागला होता. या डिवाइसच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आलेला असून, मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच ते बाजारात उपलब्ध होणार आहे. तसेच या डिवाइसची किंमत जास्त नसणार आहे.   

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप