शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Diwali Offer: झीरो डाऊन पेमेंटमध्ये घरी आणा Honda Activa स्कूटर अन् ५,००० रुपये वाचवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 18:27 IST

दिवाळीच्या काही दिवस आधी होंडा या दिग्गज दुचाकी कंपनीने ग्राहकांसाठी ऑफर जाहीर केली आहे.

दिवाळीच्या काही दिवस आधी होंडा या दिग्गज दुचाकी कंपनीने ग्राहकांसाठी ऑफर जाहीर केली आहे. जपानी कंपनीने देशातील सर्वात आवडती स्कूटर असलेल्या Honda Activa वर खास ऑफर आणली आहे. Honda ने सणासुदीच्या काळात Activa स्कूटरच्या खरेदीवर ५,००० रुपयांपर्यंत ५ टक्के कॅशबॅक ऑफर आणली आहे. पण ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे आणि ग्राहकांना या विशेष ऑफरचा लाभ ३१ ऑक्टोबरपर्यंतच घेता येईल. Honda च्या या नव्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे जाणून घेऊयात.

Honda Activa स्कूटर खरेदी करताना ५,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मात्र, यासाठी स्कूटर EMIवर खरेदी करावी लागणार आहे. जेव्हा तुम्ही निवडक बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने EMI व्यवहार करता तेव्हाच तुम्ही Honda च्या विशेष ऑफरचा लाभ घेऊ शकता. ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनी स्कूटर खरेदीवर झीरो डाऊन पेमेंट आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देत ​​आहे.

Honda Activa च्या दोन्ही मॉडेल्सवर ऑफरजपानी टू-व्हीलर ब्रँड भारतात Activa चे दोन मॉडेलची विक्री करतो. ही खास ऑफर कंपनीच्या Activa 6G (110cc) आणि Active 125 (125cc) मॉडेल्सवर उपलब्ध असेल. Activa 6G (110cc) ची एक्स-शोरूम रु.73,086 पासून सुरू होते, तर Activa 125 (125cc) ची देशात एक्स-शोरूम रु.77,062 पासून सुरू होते.

Activa 6G: स्पेसिफिकेशन आणि फिचर्सHonda Activa 6G स्कूटर तीन प्रकारांसह बाजारात उपलब्ध आहे. यात 109.51 cc BS6 इंजिनची पावर मिळते. स्कूटर 48 kmpl चा मायलेज देते आणि पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. यात सेपरेट आऊटर फ्युअल फिलर कॅप, इंजिन स्टार्ट-स्टॉप स्विच, सायलेंट स्टार्टर आणि सीट उघडण्यासाठी ड्युअल-फंक्शन स्विच यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

Activa 125cc: स्पेसिफिकेशन आणि फिचर्सHonda Activa 6G स्कूटरही तीन प्रकारांसह बाजारात उपलब्ध आहे. कंपनीने यामध्ये 124cc BS6 इंजिन वापरले आहे. याला एप्रॉन-माउंट केलेल्या एलईडी पोझिशनसह एलईडी हेडलाइट मिळते. फुल मेटल बॉडी आणि क्रोम हायलाइट्स व्यतिरिक्त, यात मल्टीफंक्शन स्विच, आयडलिंग स्टॉप सिस्टम, पास स्विच, एक्सटर्नल फ्युएल फिलर कॅप आणि फ्रंट ग्लोव्ह बॉक्स सारखी वैशिष्ट्ये देखील मिळतात. त्याचे मायलेज 46.5 kmpl इतकी आहे. 

टॅग्स :HondaहोंडाAutomobileवाहन