शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता डीएल, आरसी, परमिटच्या नूतनीकरणाची अंतिम मुदत वाढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 3:08 PM

Driving Licence, Registration Certificate : कोरोना महामारी दरम्यान, आरटीओ कार्यालयात गर्दी आणि कोविड -19 संसर्ग टाळण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्ससह महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणात सरकारने शिथिलता दिली होती.

नवी दिल्ली : ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि वाहनांच्या परमिटबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स (DL), रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) सारख्या कागदपत्रांच्या वैधतेची मुदत वाढवण्यास नकार दिला आहे. ही मुदत यापुढे वाढवली जाणार नाही. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही कागदपत्रांचे नूतनीकरण करायचे असेल तर तुमच्याकडे 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. (Center Says Driving Licence DL, Registration Certificate RC, Vehicle Permit Renewal Deadline Will Not Be Extended)

म्हणजेच, जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी आणि वाहन परमिट यासारख्या कागदपत्रांची वैधता संपुष्टात येत असेल, तर त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी 17 दिवस शिल्लक आहेत. या कागदपत्रांच्या वैधतेची अंतिम मुदत आधी 31 ऑक्टोबर 2021 अशी निश्चित करण्यात आली होती. जर तुम्ही 31 ऑक्टोबर नंतर वाहन चालवताना या बेकायदेशीर कागदपत्रांसह पकडले गेले तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

कोरोना महामारी दरम्यान, आरटीओ कार्यालयात गर्दी आणि कोविड -19 संसर्ग टाळण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्ससह महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणात सरकारने शिथिलता दिली होती. पण आता सरकारने ही सूट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार 31 ऑक्टोबरनंतर या कागदपत्रांमध्ये कोणतीही सूट नसणार आहे. जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता 1 फेब्रुवारी 2020 पूर्वी संपली असेल तर ती आतापर्यंत वैध मानली जात होती. परंतु सरकारच्या ताज्या आदेशानंतर 31 ऑक्टोबर 2021 नंतर ते बेकायदेशीर मानले जाईल.

आठ वेळा वाढवली वैधताकोरोना काळात ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, फिटनेस सर्टिफिकेट सारख्या कागदपत्रांची वैधता आतापर्यंत 8 पट वाढवण्यात आली आहे. कोरोना महामारी दरम्यान, मोटार वाहन कायदा, 1988 आणि केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 शी संबंधित कागदपत्रांच्या वैधतेसाठी पहिल्यांदा 30 मार्च 2020 पर्यंत सूट देण्यात आली होती. त्यानंतर, या तारखा 9 जून 2020; 24 ऑगस्ट 2020; 27 डिसेंबर 2020; 26 मार्च 2021; 17 जून 2021, 30 सप्टेंबर 2021 आणि 31 ऑक्टोबर, 2021 पर्यंत वाढवल्या होत्या.

टॅग्स :Automobileवाहन