डोक्यावर हात मारून घ्या...! कारची क्रॅश टेस्ट प्रत्यक्षात नाही, गेमसारखी डिजिटल होणार; 'डसॉल्ट सिस्टम्स' शोध लावतेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:31 IST2026-02-04T16:28:58+5:302026-02-04T16:31:03+5:30

Car Crash Test now digital : कारची मजबूती तपासण्यासाठी आता प्रत्यक्ष अपघात करण्याची गरज नाही. डसॉल्ट सिस्टम्सच्या डिजिटल ट्विन तंत्रज्ञानामुळे कार सेफ्टी टेस्टिंगमध्ये कशी क्रांती येणार आहे, ते जाणून घ्या.

Car Crash Test now digital : Hit your head...! Car crash tests won't be real, they'll be digital like games; 'Dassault Systems' is inventing... | डोक्यावर हात मारून घ्या...! कारची क्रॅश टेस्ट प्रत्यक्षात नाही, गेमसारखी डिजिटल होणार; 'डसॉल्ट सिस्टम्स' शोध लावतेय...

डोक्यावर हात मारून घ्या...! कारची क्रॅश टेस्ट प्रत्यक्षात नाही, गेमसारखी डिजिटल होणार; 'डसॉल्ट सिस्टम्स' शोध लावतेय...

नवी दिल्ली: ऑटोमोबाईल क्षेत्रात लवकरच एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. नवीन कार किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी आता ती भिंतीवर आदळण्याची किंवा तिचा चुराडा करण्याची गरज उरणार नाही. फ्रान्सची दिग्गज कंपनी 'डसॉल्ट सिस्टम्स' अशा एका तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्यामुळे कारचा क्रॅश टेस्ट पूर्णपणे डिजिटल आणि आभासी पद्धतीने शक्य होणार आहे.

डसॉल्ट सिस्टम्सच्या या तंत्रज्ञानामध्ये 'डिजिटल ट्विन' या संकल्पनेचा वापर केला जातो. यामध्ये गाडीचे हुबेहूब डिजिटल मॉडेल तयार केले जाते. संगणकीय सिमुलेशनद्वारे अपघाताची स्थिती निर्माण करून गाडीच्या कोणत्या भागाला किती इजा होईल आणि प्रवाशांवर त्याचा काय परिणाम होईल, याचा अंदाज लावला जातो.

खर्च आणि वेळेची मोठी बचत
पारंपारिक क्रॅश टेस्ट ही अत्यंत खर्चिक प्रक्रिया असते, कारण यामध्ये प्रत्यक्ष गाड्यांचे नुकसान होते. डसॉल्टच्या आभासी चाचणीमुळे वाहन उत्पादक कंपन्यांचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार आहे. विशेषतः नवीन स्टार्ट-अप कंपन्यांसाठी हे वरदान ठरेल. यामुळे कार निर्मितीचा वेग वाढेल आणि सुरक्षिततेचे निकष अधिक कडक होतील, असे यांना वाटत आहे. 

जागतिक स्तरावर मान्यतेसाठी प्रयत्न 
केवळ तंत्रज्ञान विकसित करून डसॉल्ट थांबलेले नाही, तर या आभासी चाचणीला अधिकृत दर्जा मिळवून देण्यासाठी कंपनी अमेरिकन नियामक संस्था (NHTSA) सोबत चर्चा करत आहे. जर याला मान्यता मिळाली, तर भविष्यात सुरक्षिततेचे स्टार रेटिंग Global NCAP/Bharat NCAP मिळवण्यासाठी प्रत्यक्ष क्रॅश टेस्टऐवजी 'व्हर्च्युअल टेस्ट' ग्राह्य धरली जाऊ शकते. परंतू, हे कितपत विश्वासार्ह असेल हे देखील पाहण्यासारखे आहे. 

Web Title : कार क्रैश टेस्ट अब डिजिटल, समय और पैसे की बचत होगी।

Web Summary : कार क्रैश टेस्ट में अब डिजिटल क्रांति होने वाली है। डसॉल्ट सिस्टम्स वर्चुअल क्रैश टेस्ट के लिए तकनीक विकसित कर रहा है, जिससे ऑटो निर्माताओं को महत्वपूर्ण लागत और समय की बचत होगी। नियामक अनुमोदन लंबित रहने पर इससे तेजी से कार विकास और सख्त सुरक्षा मानकों को बढ़ावा मिल सकता है।

Web Title : Car crash tests to go digital, saving time and money.

Web Summary : Car crash tests are set for a digital revolution. Dassault Systèmes is developing technology for virtual crash tests, saving automakers significant costs and time. This could lead to faster car development and stricter safety standards, pending regulatory approval.