शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 16:04 IST

M 1000 XR बद्दल बोलायचे झाल्यास ही सर्वात पॉवरफुल टूरिंग बाईक असल्याचा कंपनीचा दावा आहे. 

नवी दिल्ली : बीएमडब्ल्यूने (BMW) जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक M 1000 XR लाँच केली आहे. या बाईकची किंमत 45 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही नवीन बाईक कंपनीची जुनी BMW S 1000 XR बाईक सारखीच असून तिचे अॅडव्हान्स व्हर्जन आहे. M 1000 XR बद्दल बोलायचे झाल्यास ही सर्वात पॉवरफुल टूरिंग बाईक असल्याचा कंपनीचा दावा आहे. 

M 1000 XR बाईकचे इंजिन S 1000 RR सुपरबाईकसारखे आहे. या बाईकच्या इंजिनमध्ये कंपनीचे शिफ्टकॅम व्हेरिएबल टाइमिंग/लिफ्ट टेक्नॉलाजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच, बाईक टायटॅनियम व्हॉल्व्हसह, 201 hp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. या आउटपुटसह ते सर्वात पॉवरफुल टूरिंग मशीन बनते. यामध्ये मजबूत एक्सीलेरेशनसाठी याला मागील बाजूस मोठे स्प्रॉकेट्स देण्यात आले आहेत, ज्याद्वारे बाईक ताशी 278 किलोमीटरचा वेग गाठू शकते.

M 1000 XR सुपरबाईक क्षमतेसह येते. यात मोठे विंग्सचे सेट, उत्तम रेसिंग स्टाईल, स्पोर्टी इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन आणि हाय फरफॉर्मेंस एम-ब्रेक्स देण्यात आले आहेत. बाईकची डिसाईन अतिशय स्पोर्टी फील देते. यासोबतच कंफर्ट, प्रॅक्टिकल हँडलबार आणि फूटपेग स्पेसवरही लक्ष देण्यात आले आहे. यामध्ये 20 लीटरपर्यंत फ्यूल भरता येते आणि बाईकच्या सीटची उंची 850mm आहे. याशिवाय. बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक रायडर असिस्ट फीचरही देण्यात आले आहे.

अॅडव्हान्स फीचर्स या बाईकमध्ये मल्टिपल रायडिंग मोड्स, पिटलेन स्पीड लिमिटरम लाँच कंट्रोल, रेस अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम यांसारखी अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय, हीट ग्रिप्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग आणि क्रूझ कंट्रोल देखील देण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय बाजारपेठेत फक्त M 1000 XR चे स्पर्धात्मक व्हर्जन उपलब्ध आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 45 लाख रुपये आहे. या मॉडेलमध्ये कार्बन फायबर व्हील, पॅसेंजर फूटरेस्ट, जीपीएस लॅप टायमर आणि कार्बन फायबर बॉडीवर्क पाहता येईल. 

टॅग्स :bikeबाईकBmwबीएमडब्ल्यूAutomobileवाहन