Mercedes-Benz आणि BMW या दोन जर्मन कार उत्पादक कंपन्या एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही कंपन्या इंजिन भागीदारीबाबत चर्चा करत आहेत. ही चर्चा यशस्वी झाली, तर जर्मन ऑटो उद्योगातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा करार असेल. या करारांतर्गत दोन्ही कंपन्या एकत्र मिळून आपल्या गाड्यांसाठी इंजिन तयार करतील.
BMW चे इंजिन आणि Mercedes च्या कार्समीडिया रिपोर्ट्सनुसार, मर्सिडीज त्यांच्या आगामी पेट्रोल आणि प्लग-इन हायब्रिड कारमध्ये BMW चे प्रसिद्ध B48 फोर-सिलिंडर टर्बोचार्ज्ड इंजिन वापरू शकते. हे इंजिन बीएमडब्ल्यू आणि मिनीच्या अनेक कारमध्ये आधीच बसवले जात आहे. या इंजिनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हे वेगवेगळ्या कार प्लॅटफॉर्मवर बसवता येते, मग ते ट्रान्सव्हर्स असो किंवा लॉगिटिंडुअल. त्यामुळेच हे इंजिन Mercedes च्या CLA, GLA, GLB, C-क्लास, E-क्लास आणि आगामी लिटिल G SUV सारख्या कार्ससाठी उपयुक्त ठरेल.
Mercedes कडे सध्या 1.5 लिटरचे M252 इंजिन सध्या Mercedes कडे 1.5 लिटरचे M252 इंजिन आहे, जे माइल्ड हायब्रिड टेक्नोलॉजीसाठी योग्य आहे. पण, याला प्लग इन हायब्रिड किंवा रेंज एक्सटेंडर म्हणून वापरणे शक्य नाही. त्यामुळेच BMW चे B48 इंजिन याची कमतरता दूर करेल.
प्रोडक्शन आणि लोकेशनया भागीदारी अंतर्गत इंजिनचे प्रोडक्शन BMW च्या ऑस्ट्रियामधील स्टायर प्लांटमध्ये होऊ शकते. तसेच, दोन्ही कंपन्या संयुक्तपणे अमेरिकेत एक प्लांट उभारू शकतात.
Mercedes चा फायदाMercedes ला या कराराद्वारे अनेक फायदे होईल. R&D खर्चाशिवाय प्रमाणित, यूरो-7 कंप्लायंट इंजिन तात्काळ मिळेल. या इंजिनद्वारे कंपनी आपल्या प्लग-इन हायब्रिड रेंजला वेगाने वाढवेल. याद्वारे, BMW लाही मोठा आर्थिक लाभ मिळेल.